9.8 C
New York
Friday, May 23, 2025

Buy now

spot_img
spot_img

केज तहसिल कार्यालया समोर रिपाइंचे उपोषण

केज तहसिल कार्यालया समोर रिपाइंचे उपोषण

केज प्रतिनिधी – तालुक्यातील उमरी येथील अतिक्रमित गायरान जमिनीवर होऊ घातलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात आणि प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आणि नगर जिल्ह्यातील दलित युवकांना अमानुष पद्धतीने मारहाण झाली त्याच्या निषेधार्थ केज तालुका रिपाइंच्या नेतृत्वाखालीआमरण उपोषण सुरू आहे.

केज तालुक्यातील उमरी येथील सरकारी गायरान जमीन ही येथील भूमिहीन अनेक वर्षा पासून अतिक्रमण करून वहिती करून कसत आहेत. त्यातील पिकांवर त्यांच्या कुटुंबाची गुजराण करीत आहेत. त्या अतिक्रमणांची एक-ई या महसुली अभिलेख्याला नोंद देखील झालेली आहे. गायरान जमिनीवरील भूमिहिनांनी केलेले अतिक्रमणे नियमित करण्या संदर्भात वेळोवेळी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू आहे. या गायरान जमिनीवर खरीप पिकांची पेरणी केलेली आहे. मात्र या गायरान जमिनी संदर्भात सज्जाच्या तलाठ्याने चुकीची माहिती दिली असल्याचा आरोप रिपाइं (ए) यांनी केला असून उभ्या पिकात एम एस डी सी एल बीड या सौर उर्जा प्रकल्प उभारणीचे काम करणाऱ्या कंपनीने त्यांचे बोर्ड लावले आहेत. तसेच अहमदनगर जिल्ह्यातील हरेगाव येथे शेळ्या आणि कबुतरांची चोरी केल्याच्या आरोपावरून तीन दलित युवकांना झाडाला उलटे टांगून अमानुष मारहाण केली व त्याची व्हीडिओ क्लिप काढून ती सोशल मिडियावर व्हायरल केली त्याच्या निषेधार्थ दि. 29 ऑगस्ट रोजी रिपाइं (ए) चे तालुकाध्यक्ष दिपक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली केज तहसील कार्यालया समोर गायरानधारक आमरण उपोषणला बसले आहेत. या आंदोलनात तालुका अध्यक्ष दिपक कांबळे, जिल्हा सल्लागार उत्तम आप्पा मस्के, जिल्हा उपाध्यक्ष गोवर्धन वाघमारे, जिल्हा संघटक रविंद्र जोगदंड, शहराध्यक्ष भास्कर मस्के, तालुका सरचिटणीस पत्रकार गौतम बचुटे, उपाध्यक्ष बाळासाहेब ओव्हाळ, कैलास जावळे, जेष्ठ नेते दिलीप बनसोडे, विकास आरकडे, मसू बचुटे, विजय डोंगरे, रुपचंद ढालमारे, रघुनाथ ढालमारे, प्रशांत ढालमारे, लोचना सोनवणे यांच्यासह रिपाइंचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!