15.1 C
New York
Saturday, May 18, 2024

Buy now

धोंडराई माध्यमिक विद्यालयात आरोग्य तपासणी शिबीर संपन्न.

धोंडराई माध्यमिक विद्यालयात आरोग्य तपासणी शिबीर संपन्न.

२२० विद्यार्थ्यां व विद्यार्थिनी चीआरोग्य तपासणी ; विद्यार्थ्यांनी घेतली आरोग्य अधिकाऱ्यांची मुलाखत 

गेवराई प्रतिनिधी – जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळ बीड संचलित, माध्यमिक विद्यालय धोंडराई येथे शारदा स्पो र्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष तथा युवा नेते रणवीर अमरसिंह पंडित यांच्या प्रेरणेने शनिवारी आरोग्य अधिकारी मुलाखत व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले.

यावेळी व्यासपीठावर डॉ.शेख रियाज मन्सुर, डॉ.धस सुहास, डॉ. कावळे आश्विनी, डॉ.मैंद मॅडम, आरोग्य सेवक चव्हाण डि.के, शाळेचे मुख्याध्यापक भक्तराज पौळ यांच्या सह गावातील प्रतिष्ठित नागरीक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करताना मुख्याध्यापक भक्तराज पौळ म्हणाले की युवा नेते रणवीर काका पंडित यांच्या प्रेरणेने जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या आपल्या शाळेत शारदा ज्ञानोत्सव – २०२३ अंतर्गत विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी या उद्देशाने तसेच विद्यार्थ्यांना हसत खेळत शिक्षण मिळावे या हेतुने वार्षिक नियोजन करुन विविध शालेय उपक्रम राबविले जातात. त्याअनुषंगाने आपण आरोग्य अधिकारी यांची मुलाखत तसेच विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी शिबीर घेतले आहे. २२० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून यापुढेही विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने वेगवेगळे उपक्रम राबवले जातील. दरम्यान यावेळी विद्यार्थ्यांनी आरोग्य आधिकाऱ्यांना विविध आजार व त्यावरील उपाय याबाबत प्रश्न विचारले तर आरोग्य आधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देवून आजार व त्यावरील उपचार यावर अनमोल मार्गदर्शन केले. ते म्हणाले की प्रत्येकाने सकाळी लवकर उठून नियमित पणे व्यायाम करुन शुध्द पाणी आणि चांगला आहार घेतला पाहिजे. मोबाईल चा अतिवापर टाळला पाहिजे तसेच सर्वांनी चांगला अभ्यास करुन विविध क्षेत्रात नावलौकिक मिळावून शाळेचे आणि आपले नाव उज्वल करावे अशा शुभेच्छाही शेवटी बोलताना दिल्या. यावेळी शाळेतील शिक्षक बहिरे बी.जी,पाठक यु.पी.,काकडे एस.बी.,शेंबडे ए.के.,फरतारे बी.एन., काझी एस.एस.,खोजे पी.के., बागडे आर.एम.,चाटे एम.बी.,आबुज बी.बी.,शेख एम.ए.,कापसे के.व्ही. पिसाळ सर, कव्हळे सर यांच्या सह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन बहिरे सर तर आभार प्रदर्शन खोजे सर यांनी केले.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!