संशयावरून डोक्यात दगड घालून नवऱ्याने केला बायकोचा खून..
गेवराई प्रतिनिधी – चारित्र्यावर संशय घेत स्वतः च्या पतीने झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना आज ता. 25 रोजी पहाटे गेवराई तालुक्यातील चकलांबा येथील परिसरात घडली.
या घटनेनंतर पती स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला. आणि मी पत्नीच्या डोक्यात दगड घातल्याचे पोलिसांना सांगितले. या प्रकरणात पोलिसांनी फिर्याद दिली असून पतीविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.
त्यानंतर स्वतः पोलीस ठाण्यात हजर होवून पत्नीच्या डोक्यात दगड घातल्याचे सांगितले. मला तिच्या चारित्र्यावर संशय होता. म्हणून मी हे कृत्य केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
या प्रकरणात चकलांबा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनंता तांगडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी शरामद उर्फ समीर कादर शेख याच्याविरूध्द चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास एकशिंगे करत आहेत.


