15.1 C
New York
Saturday, May 18, 2024

Buy now

सत्ताधारी सभेला उत्तर सभा घेण्यात व पक्ष फोडा फोडीत व्यस्त ?

सत्ताधारी सभेला उत्तर सभा घेण्यात व पक्ष फोडा फोडीत व्यस्त ?

बीड प्रतिनिधी – बीडमध्ये एकापाठोपाठ सभा होत चालल्या आहेत. 27 ऑगस्ट रोजी होणारी सभा ही शेतकरी हिताची असेल का ? 17 ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाची सभा झाली यामध्ये अनेकांनी पक्षप्रवेश केला यानंतर उद्या 27 ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाची सभा होणार आहे. सत्ताधारी मात्र सभेला उत्तर सभा घेण्यात आणि पक्ष फोडाफोडीत व्यस्त आहेत. उद्या 27 तारखेला बीडमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा होणार आहे. बीडची सभा ही पूर्ण राज्यभार सभा होण्याअगोदरच गाजलेली आहे. गाजण्याचे कारण म्हणजेच बीडमध्ये लावण्यात आलेले होल्डिंग, बॅनर, कट आउट. बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. हा जिल्हा ओळख ऊसतोड कामगारांची आहे ही ओळख कधी पुसेल याकडे मात्र या सरकारचे सत्ताधाऱ्यांचे लक्ष नाही परंतु सभा घेण्यातच व्यस्त आहे. राज्यात शेतकरी उपाशी आणि राजकीय नेते तुपाशी अशी टीका बदामराव पंडित यांनी केली आहे. सर्व बीड जिल्हा हा बॅनरने आणि होल्डिंग्सने सजून गेला आहे. शेतकऱ्या विषयीची भावना दाखवणारे बॅनर बीडमध्ये लावण्यात आले होते परंतु सभे अगोदरच ते अज्ञात व्यक्तीने काढले आहे. या बॅनर मधून शेतकरी पुत्रांना उपमुख्यमंत्री अजित पवारांना काही प्रश्न विचारले होते. परंतु सभा होण्याअगोदरच अज्ञात व्यक्तीने हे बॅनर काढले आहे. उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार महत्त्वाचा निर्णय घेतील का हे पाहणं औचित्याचे ठरणार आहे. शेतकरी हिताची ही सभा आहे का असा सुद्धा नागरिकांमधून सवाल उपस्थित केला जात आहे. बीड जिल्ह्यातील शेतकरी पाऊस नसल्यामुळे हातात झाला आहे मात्र सत्ताधारी सभेला उत्तर सभा घेण्यात आणि पक्ष फोडाफोडीत व्यस्त असल्याची टीका देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बदामराव आबा पंडित यांनी केली आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!