21.7 C
New York
Friday, May 17, 2024

Buy now

केज तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्याना तात्काळ मदत करा- शेतकरी शाम सांगळे

  • केज तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्याना तात्काळ मदत करा- शेतकरी शाम सांगळे
  • केज प्रतिनिधी : तालुक्यात जवळपास मागील एका महिन्यापासून पाऊस न पडल्याने शेती पिकांचे अतोनात नुकसान होत असून उभे पीक करपत आहेत. काही ठिकाणी पीक हिरवी दिसत आहेत मात्र पावसाअभावी फुलं गळून चालली आहेत. त्यामुळे कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी शाम सांगळे यांनी केली आहे.
  • पावसाच्या खंडामुळे संपूर्ण तालुक्यातील पिके वाळत आहेत. शेतकरी वर्ग चिंतातुर झालेला असताना कोणीही याकडे लक्ष द्यायला तयार नाही. सत्ताधारी आपापली पोळी भाजण्यात व्यस्त आहेत. पीक विमा कंपनीने जिल्हा भरातील शेतकऱ्यांना पिकविम्याची सरसकट 25% अग्रीम रक्कम शेतकऱ्यांना तात्काळ द्यावी व केज तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून तालुक्याला मदत करण्यात यावी अशी मागणी शेतकरी शाम सांगळे यांनी केली आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!