ज्ञानेश्वरीवर वेडे होऊन प्रेम करा जीवनाचे कल्याण होईल – अर्जुन महाराज खाडे
स्व. सीताबाई अण्णासाहेब मुंडे व स्व. अण्णासाहेब मुंडे यांच्या स्मरणार्थ आयोजित न्यानेश्र्वरी भवकथेचा सांगता समारंभ उत्सवात
उपसंपादक – गीतांजली लव्हाळे
वडवणी प्रतिनिधी: – स्व.सीताबाई अण्णासाहेब मुंडे व स्व.अण्णासाहेब देवराव मुंडे यांच्या पुण्यस्मरणा निमित्त आमचे मुळगाव श्री क्षेत्र चारदरी तालुका धारूर जिल्हा बीड येथे दिनांक 20 मे 2023 रोजी हरिभक्त परायण अर्जुन महाराज खाडे आळंदी देवाची यांच्या काल्याच्या कीर्तनाने ज्ञानेश्वरी भाव कथेचा समारोप करण्यात आला.
यावेळी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमण मा.मोहनराव जगताप साहेब ,संतोष आबा जाधव ,सभापती माननीय शरद यादव आमचे बंधू मा.दादासाहेब मुंडे, मा .बाबरी मुंडे ,अॕड खरोसेकर साहेब उच्च न्यायालय औरंगाबाद ,राज्य मंडळाचे कक्षा अधिकारी आमचे मेहुने तथा भाऊजी एम डी जाधवर साहेब यांच्यासह राजकीय, सामाजिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते कीर्तन संपल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमांमध्ये 31 ज्ञानेश्वरीचे मोफत वितरण आले ही ज्ञानेश्वरी भावकथा 12 मे पासून सतत हरिभक्त परायण अर्जुन महाराज खाडे यांच्या रसाळ वाणीतून ऐकण्याचा योग चारदरी व परिसरातील भक्तगणांना झाला या भाव कथेचा समारोप 20 मे रोजी करण्यात आला यावेळी गावकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला
स्वर्गीय सीताबाई मुंडे व स्वर्गीय अण्णासाहेब मुंडे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त ठेवण्यात आलेल्या या भाव कथेसाठी चारदरी व चारदरी परिसरातील जन समुदायाचा व व भाविक भक्तांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला हा प्रतिसाद पाहून माझे मन भरून आले अशा प्रकारची प्रतिक्रिया श्री. माणिक शेठ नहार व श्री. गोरख अण्णासाहेब मुंडे यांनी व्यक्त केली. ज्या मायमाऊलीने व पिताजी ने मला जन्म दिला त्यांच्या प्रति असणारी कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता या पुण्यस्मरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला हे पाहून समाधान वाटले कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन प्रा. श्रीराम मुंडे यांनी केले.