16.2 C
New York
Friday, May 17, 2024

Buy now

अंधापुरी घाट येथील 25 वर्ष वयाच्या अविवाहित तरुणाला झाला कॅन्सरचा आजार..!

अंधापुरी घाट येथील 25 वर्ष वयाच्या अविवाहित तरुणाला झाला कॅन्सरचा आजार..!

♦️निवासी संपादक-दिपक वाघमारे

बीड :  बीड तालुक्यातील अंधापुरी घाट येथील तरुण नाव- धनराज लक्ष्मण जगताप या तरुणाला कॅन्सरचा आजार जडलेला आहे.

या तरुणाची घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे, उसने व बँक कर्ज काढून या तरुणाचे कॅन्सर चे ऑपरेशन केले आहे. कॅन्सर साठी 4 लाख 16 हजार रुपये आत्तापर्यंत खर्च आला आहे. परंतु त्याच्या इथुन पुढे होणाऱ्या इंजेक्शन,औषधे व केमो चा खर्च हा झेपत नसल्यामुळे त्याला मदतीची अत्यंत गरज आहे.

महात्मा ज्योतिबा फुले या योजने अंतर्गत केमो घेतलेले आहेत परंतु या योजने अंतर्गत महिन्याला एकच केमो घेता येतो असं तरुणाने ‘माऊली न्यूज’ शी बोलताना सांगितले आहे. परंतू महिन्याला 3 केमो घ्यावे लागतात. दोन केमो चे पैसे हे द्यावे लागतात.

अंदाजे – एक स्टँडर्ड केमो – 1 लाखाच्या पुढे, आता एकूण नऊ केमो राहिलेले आहेत असे कॅन्सरग्रस्त तरुणांकडून सांगण्यात आले आहे. त्यासाठी त्याला आर्थिक मदतीची अत्यंत गरज आहे.

त्यासाठी सर्वांना आवाहन करण्यात येते की, या कॅन्सरग्रस्त तरुणाला  आपण सढळ हाताने आर्थिक मदत करून या कॅन्सरग्रस्त तरुणाचे प्राण वाचवावेत. हिच सर्वांना विनंती.

मदतीसाठी बँक तपशील :

 Bank : State Bank of India

Branch : Manjarsumba

Bank Account number – 37965994343

IFSC code – SBIN0020627

Phone pay / Google pay – 7875272778

अधिक माहितीसाठी संपर्क साधा. 

अभिजीत पवार- पत्रकार – 9373956727

दिपक वाघमारे-पत्रकार- 9021052840

धनराज जगताप ( संबधित रुग्ण ) – 7875272778

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!