9.8 C
New York
Friday, May 23, 2025

Buy now

spot_img
spot_img

बीडमध्ये ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या मराठवाडा अधिवेशनाची जय्यत तयारी..!

  • बीडमध्ये ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या मराठवाडा अधिवेशनाची जय्यत तयारी..!
  • ७०० हून अधिक पत्रकार सहभागी होणार
  • ♦️निवासी संपादक-दिपक वाघमारे 
  • बीड दि.२९ : व्हॉईस ऑफ मीडियाच्यावतीने बीड येथे मराठवाडा अधिवेशन रविवार, दि.३० एप्रिल रोजी माँ वैष्णो पॅलेस, एमआयडीसी, बीड येथे होत आहे. या अधिवेशनाची जय्यत तयारी सुरू आहे. अधिवेशनात दिग्गज पत्रकारांचे मार्गदर्शन, चर्चासत्र, मुलाखतीसह विविध कार्यक्रम होत असून मराठवाड्यातील ७०० ते ८०० पत्रकार उपस्थित राहतील असे नियोजन करण्यात आलेले आहे.
  • अधिवेशनाचे उद्घाटन सकाळी ११ वाजता बीडच्या खासदार डॉ.प्रितम मुंडे, छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील हस्ते तर जिल्हाधिकारी दीपा मुधोळ, पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, व्हॉईस ऑफ मीडीयाचे उर्दू विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती हारुण नदवी यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. दुपारच्या सत्रात २ वाजता व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मंदार फणसे, राज्याध्यक्ष अनिल म्हस्के, टेलिव्हिजन विंगचे राज्याध्यक्ष विलास बडे, राष्ट्रीय कार्यालयीन सचिव दिव्या पाटील यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तर, समारोप सत्रासाठी माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे खाजगी सचिव ओमप्रकाश शेटे यांची उपस्थिती राहणार आहे. या अधिवेशनास मराठवाड्यातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्य उपाध्यक्ष संजय मालाणी, राज्य कार्यवाहक तथा बीड जिल्हाध्यक्ष बालाजी मारगुडे, मराठवाडा अध्यक्ष विजय चोरडिया, जिल्हा कार्याध्यक्ष दिनेश लिंबेकर, मराठवाडा कार्याध्यक्ष जालिंदर धांडे, मराठवाडा उपाध्यक्ष शुभम खाडे, मराठवाडा संघटक आनंद डोंगरे यांच्यासह व्हॉईस ऑफ मीडियाचे बीड जिल्हा व मराठवाडा कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी व संयोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
  • कोळगावच्या ब्लॉगरची प्रकट मुलाखत
  • या अधिवेनाशात सोशल मीडियाचा सकारात्मक वापर केल्यास काय बदल घडू शकतो असे दाखवून देत कोळगाव (ता. गेवराई) हे नाव देशभरात गाजवणारे अक्षय रासकर यांची प्रकट मुलाखत घेतली जाणार आहे. त्यातून पत्रकारांना बदलत्या तंत्रज्ञानाची माहिती होणार आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!