14.3 C
New York
Monday, May 20, 2024

Buy now

कृषी उत्पन्न बाजार समिती बीड निकाल:,आ.संदीप क्षीरसागर यांचा 18 पैकी 15 जागेवर दणदणीत विजय:,माझी मंत्री जयदत्त क्षीरसागर पराभूत..!

  • कृषी उत्पन्न बाजार समिती बीड निकाल:,आ.संदीप क्षीरसागर यांचा 18 पैकी 15 जागेवर दणदणीत विजय:,माझी मंत्री जयदत्त क्षीरसागर पराभूत..!
  • ♦️निवासी संपादक-दिपक वाघमारे
  • बीड दि,२९ : राज्यातील 147 कृषी उत्पन्न बाजार समितींसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. आज कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मतमोजणी  पार पडली. यापैकी काही बाजार समित्यांचे निकाल समोर आले असून बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांनी काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा दणदणीत पराभव केला आहे. निवडणूकीत 18 पैकी 15 जागेवर आमदार संदीप क्षिरसागर पुरस्कृत उमेदवार विजयी झाले आहेत.
  • याबाबत अधिक माहिता अशी की, बीड कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल हाती आला. ज्यामध्ये आमदार संदीप क्षीरसागरांनी काका जयदत्त क्षीरसागरांच्या चाळीस वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावला आहे. आमदार संदीप क्षीरसागर यांनी 5 पक्षांची मोट बांधून काका विरोधात कडवे आव्हान दिले होते. हाती आलेल्या निकालानुसार 18 पैकी 15 जागेवर दणदणीत विजय मिळवत बीड बाजार समितीवर सर्वपक्षीय आघाडीचा झेंडा फडकवला आहे.
  • या निकालाने पुतण्याने काकाला धोबीपछाड  केल्याचे बोलले जात असून हा जयदत्त क्षीरसागर यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. मागील 35 वर्षांपासून बीड कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची एक हाती सत्ता होती.
  • दरम्यान, या विजयानंतर संदीप क्षीरसागर यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष करत गुलालाची उधळण केली आहे. ही निवडणुक मात्र प्रतिष्ठेची बनवून आमदार संदीप क्षीरसागर यांनी शिंदे गट, ठाकरे गट, भाजपा, शिवसंग्राम आणि राष्ट्रवादी पक्षाची मोट बांधून निवडणुकीला सामोरे गेले होते.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!