12.4 C
New York
Sunday, May 25, 2025

Buy now

spot_img
spot_img

संत बंकटस्वामी महाराज पुण्यतिथी महोत्सव नेकनुर मध्ये सात दिवस अवतरणार “भक्तीपंढरी”

  • संत बंकटस्वामी महाराज पुण्यतिथी महोत्सव नेकनुर मध्ये सात दिवस अवतरणार “भक्तीपंढरी”
  • अन्नदानासह सात दिवस चालणार भव्य अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथा..
  • नेकनुर प्रतिनिधी:  वारकरी सांप्रदायातील महान संत श्रीगुरु वै .बंकटस्वामी महाराज यांच्या ७९ व्या पुण्यतिथि महोत्सवा निमित्त श्री क्षेत्र नेकनूर येथे भव्य अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे . दि २९ एप्रिल वार शनिवार ते दिनांक ६ मे वार शनिवार या आठ दिवसाच्या कालावधीमध्ये भव्य ज्ञानयज्ञ संपन्न होणार आहे . यात महाराष्ट्रातील  सुप्रसिद्ध भागवत कथाकार श्री ह भ प समाधान महाराज शर्मा यांची सात दिवस भागवत कथा होणार आहे . तसेच महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांचे कीर्तने होणारं आहेत . या सर्व कार्यक्रमाचा भावीक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री ह भ प महंत लक्ष्मण महाराज मेंगडे मठाधिपती बंकट स्वामी मठ नेकनुर,पंढरपूर,आळंदी विश्वस्त,अन्नदान कमिटी,गावकरीमंडळी नेकनुरकर यांच्या वतीने करण्यात आले आहे .
  • पहाटे ४ ते ६ काकडा भजन , सकाळी ७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण , १० ते १२ गाथा भजन , दुपारी १२ ते २ भोजन , २ ते ५ भागवत कथा , ५ ते ६ हरीपाठ रात्री ९ ते ११ हरिकिर्तन व ११ नंतर संगीत भजन व हरीजागर होईल . श्री क्षेत्र नेकनुर येथे होणाऱ्या वारकरी संप्रदायाचे भक्ती सूर्य श्री गुरु बंकट स्वामी महाराज यांच्या ७९ व्या पुण्यतिथी उत्सवा निमित्त भव्य अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भागवत कथाकार समाधान महाराज शर्मा यांचे श्राव्य भागवत कथा होणार आहे , तसेच महाराष्ट्रातील नांमाकित कीर्तनकारांची किर्तने व संगीत भजन , प्रवचन आदि कार्यक्रम होनार आहेत . दिनांक २९ एप्रिल २०२३ रोजी सकाळी नऊ वाजता श्री स्वामींच्या पालखीची नेकनूर येथिल बंकट स्वामी शिक्षक कॉलनी येथून भव्य प्रभात फेरी निघणार आहे . या सप्ताहा दरम्यान ह.भ.प.संजय महाराज पाचपोर , ह.भ.प. विशाल महाराज खोले , ह.भ.प. बाळू महाराज गिरवाकर , ह.भ.प. प्रदीप महाराज नलवडे , ह.भ.प. पुरूषोत्तम महाराज पाटील , ह.भ.प उमेश महाराज दशरथे , यांचे रात्री ९ ते ११ किर्तन होईल शनिवार दिनांक ६ मे रोजी ह.भ.प. महंत लक्ष्मण महाराज मेंगडे , मठाधिपती बंकटस्वामी संस्थान यांचे सकाळी ११ ते १ काल्याचे किर्तन होईल व त्यानंतर महाप्रसाद होईल. तरी भाविक भक्तांनी या किर्तनाचा व भागवत कथेचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे .
  • सप्ताहात बंकटस्वामी संस्थान करणार मुलींचे “कन्यादान”
  • सप्ताह दरम्यान विवाह सोहळा आयोजित करण्यात येणार आहे, त्यामध्ये बंकटस्वामी संस्थान लग्नाचा खर्च उचलून समाज उपयोगी साहित्य देऊन कन्यादान करणार असल्याने परिसरातील इच्छुक वर वधू पित्यांनी याचा लाभ घेऊन आपल्या मुला मुलींचे विवाह सप्ताहात करण्याचे आवाहन ह भ प लक्ष्मण महाराज मेंगडे विश्वस्त व अन्नदान कमिटी, ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!