13.6 C
New York
Sunday, May 25, 2025

Buy now

spot_img
spot_img

नॅशनल हायवेवर लगत हाॅटेल २५ किलो गांजा पकडला;गेवराई पोलिसांची दबंग कामगिरी

नॅशनल हायवेवर लगत हाॅटेल २५ किलो गांजा पकडला;गेवराई पोलिसांची दबंग कामगिरी

गेवराई दि २६ सोमनाथ मोटे सह शाम जाधव

शहरालगत असनाऱ्या बायपास जवळ एका खाजगी हॉटेलवर २५ किलो गांजा विक्रीसाठी येत आहे अशी माहिती गुप्त बातमी दारामार्फत गेवराई पोलिसांना मिळाली व तात्काळा वरिष्ठ अधिकारी यांचे पथक घटनास्तळावर दाखल झाले व हॉटेलमध्ये जाऊन झडती घेतली व त्याठिकाणी २५ किलो गांजा सापडला व एकाला गेवराई पोलिसांनी जेरबंद केले असुन त्यावर गून्हा दाखल करण्यात आला आहे .

याबाबद सविस्तर माहिती अशी की , गौसखान अमनउल्लाखान ( वय ४५ वर्ष ) राहणार गेवराई तालुका गेवराई जिल्हा बीड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असुन ( दि २५ ) जानेवारी मध्यरात्री १ वाजण्यादरम्यान गेवराई पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक प्रफूल्ल साबळे यांना गूप्त बातमी दारामार्फत माहिती मिळाली की गेवराई येथील बायपास वरील यादगार हॉटेलवर २५ कीलो गांजा विक्रीसाठी येत आहे त्यांनी तात्काळ पोलिस निरीक्षक रविंद्र पेरगूलवार यांना सगळी माहिती दिली तसेच पोलिस निरीक्षक रविंद्र पेरगूलवार व प्रफूल्ल साबळे हे आपल्या काही सहकारी यांना घेऊन घटनास्तळावर छापा मारला यामध्ये २५ कीलो गांजा नावाचा आम्लपदार्थ मिळून आला तसेच वरील एका आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या व रात्री उशीरा या ठिकाणी वरिष्ठ उप आधीक्षक सोप्नील राठोड यांनी भेट दिली तसेच वरील ईसमाविरोधात गेवराई पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक रविंद्र पेरगूलवार यांच्या फिर्यादी वरूण एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे तसेच सदरची कार्यवाई उप अधीक्षक स्वप्निल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविंद्र पेरगूलवार , साहय्यक पोलिस निरीक्षक प्रफूल्ल साबळे , नितीन राठोड ,राजू भिसे , कृष्णा जायभाये , विठ्ठल राठोड , संजय राठोड , यांनी केली आहे .व पुढील तपास उपनिरीक्षक तूकाराम बोडके हे करत आहेत

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!