16.9 C
New York
Friday, May 17, 2024

Buy now

ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद शाळा अंधापुरी घाट ता जि बीड येथे 74 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा..!

ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद शाळा अंधापुरी घाट ता जि बीड येथे 74 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा..!

♦️निवासी संपादक-दिपक वाघमारे

बीड दि,२६- बीड तालुक्यातील अंधापुरी घाट येथे ग्रामपंचायत कार्यालय व जि.प. प्रा. शाळा या ठिकाणी 74 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी गावच्या सरपंच श्रीमती मनीषा पप्पू जगताप ह्या उपस्थित होत्या.

सरपंच मनीषा जगताप यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय येथे ‘भारताचा अभिमान’तिरंगा
राष्ट्रध्वज फडकून त्यास सलामी दिली आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी तसेच भारताला प्रजासत्ताक बनवण्यासाठी बलिदान दिलेल्या थोर महापुरुषांना, विरांना अभिवादन केले. यावेळी अंधापुरी घाट चे ग्रामसेवक गणेश शिंदे,तलाठी संतोष हांगे, पत्रकार दिपक वाघमारे तसेच गावातील ग्रामस्थ,प्रतिष्ठित नागरिक, अशा वर्कर,अंगणवाडी सेविका,संगणक चालक,माजी सरपंच,सदस्य, जि प प्रा शाळेचे मुख्यद्यापक वाघ सर,जाधव सर,जगदाळे सर व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते तसेच अंधापुरी गावचे सुपुत्र भारत मातेचे जवान लक्ष्मण जगताप हेही यावेळी उपस्थित होते गावाकऱ्यांच्या व शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

ग्रामसेवक गणेश शिंदे व सरपंच यांनी ग्रामपंचायत कार्यालय येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून नारळ फोडून अभिवादन केले यावेळी गावातील सर्व नागरिक उपस्थित होते सर्वांनी राष्ट्रध्वजास सलामी देवून थोर महापुरुषांना प्रजासत्ताक दिनानिमित्त अभिवादन केले.

ग्रामपंचायतचा ध्वजारोहनाचा कार्यक्रम संपल्या नंतर जि प प्रा शाळा येथे सरपंच मनीषा पप्पू जगताप यांनी शाळेचे मुख्यध्यापक- वाघ सर,जाधव सर यांच्या मदतीने भारताची आन बान शान तिरंगा राष्ट्रध्वज फडकून व सलामी देवून महापुरुषांना प्रजासत्ताक दिना निमित्त अभिवादन केले. यावेळीही सर्वजण उपस्थित होते सर्वांनी राष्ट्रध्वजास सलामी देवून देशाच्या स्वातंत्र्यासाठी ,देशाला प्रजासत्ताक बनवण्यासाठी बलिदान दिलेल्या थोर महापुरुषांना अभिवादन करण्यात आले.

प्रजासत्ताक दिनानिमित्त जि प प्रा शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिना विषयी चांगल्या प्रकारे आपले मनोगत वेक्त्त केले तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना प्रजासत्ताकदिना निमित्त शाळेकडून वह्या पेनचे वाटप करून त्यांना खाऊ देण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले.

प्रजासत्ताक दिनानिमित्त जि प प्रा शाळेच्या वतीने,मुख्याध्यापक वाघ सर,जाधव सर,जगदाळे सर या सर्वांनी मेहनत घेऊन “वार्षिक स्नेहसम्मेलनाचा कार्यक्रम “आयोजित केला होता यानिमित्त शाळेतील विध्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी वेगवेगळ्या गाण्यावर उत्कृष्ट असे नृत्य काम केले यावेळी गावातील महिला,पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शाळेचे मुख्यद्यापक वाघ सर,जाधव सर,जगदाळे सर यांनी मेहनत घेवून प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत चांगल्या प्रकारे सजावट,रंग रंगोटी करून तसेच रांगोळी काढून शाळेत प्रसन्नतेचे वातावरण तयार केले होते आणि यामुळेच शाळेत सर्वामध्ये प्राजासत्ताक दिनानिमित्त उत्साह निर्माण झाला होता.

केंद्र शासनाने राबवलेल्या ‘अमृत सरोवर’ या मोहिमे अंतर्गत अंधापुरी घाट ता जि बीड येथील तलावावर ग्रामपंचायत कार्यालय व गावकर्यांच्या वतीने व प्रशासनाच्या वतीने 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त तलावावर तिरंगा राष्ट्रध्वज फडकवण्यात आला.यावेळी सरपंच पप्पू जगताप, ग्रामसेवक गणेश शिंदे,तलाठी संतोष हांगे,पत्रकार दिपक वाघमारे, ग्रामरोजगार सेवक बाबू (अण्णा) टेकडे,संगणक चालक अंगद घोरपडे,व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!