13.6 C
New York
Sunday, May 25, 2025

Buy now

spot_img
spot_img

वोट देणार त्यासोबत नोटही देणार!

  • वोट देणार त्यासोबत नोटही देणार!
  • राडी सर्कल मधील ग्रामस्थांनी केला अशोक हिंगे यांना विजयी करण्याचा संकल्प..
  • अंबाजोगाई / प्रतिनिधी:-बीड लोकसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अशोक हिंगे पाटील यांची ग्रामीण भागामध्ये दिवसेंदिवस क्रेझ वाढू लागली असून आता तर नागरिकांनी नोट बरोबर वोटही देणार! असा संकल्प करीत अशोक हिंगे पाटील यांना बीड लोकसभा निवडणुकीत विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. याची सुरुवात राडी सर्कलमधील ग्रामस्थांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मधील शिल्लक राहिलेली देणगी 21 हजार रुपये अशोक हिंगे पाटील यांना निवडणुकीसाठी देणगी म्हणून देऊन केली आहे.
  • बीड लोकसभा निवडणुकीमध्ये दुरंगी लढत होणार असल्याच्या वल्गना केल्या जात असल्या तरी ही लोकसभा निवडणूक तिरंगी होणार असल्याचे आता नागरिकांमधून बोलले जात आहे. अशोक हिंगे पाटील यांची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली असून नागरिकांनीच अशोक हिंगे पाटील यांना विजयी करण्यासाठी प्रचार सुरू केला असल्याचे चित्र सर्वत्र दिसू लागले आहे. याचाच एक भाग म्हणजे अशोक हिंगे पाटील हे अंबाजोगाई तालुक्यातील राडी सर्कल मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ध्वजारोहण करण्यासाठी गेले असता येथील ग्रामस्थांनी अशोक हिंगे पाटील यांचे जोरदार स्वागत करत अशोक हिंगे पाटील यांना निवडून देण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. वोट तर देणारच त्याबरोबरच नोटही देणार! असे म्हणत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मधील शिल्लक राहिलेली देणगी रुपये 21,000/- अशोक हिंगे पाटील यांना निवडणूक देणगी म्हणून बहाल केली. यामुळे बीडची लोकसभा निवडणूक तिरंगी होणार हे निश्चित झाले आहे.
  • यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे, युवा नेते अजय सरवदे, युवा तालुकाध्यक्ष अनिल कांबळे, जिल्हा सचिव अरुण बनसोडे, जिल्हा सचिव परमेश्वर लांडगे, शहराध्यक्ष अमोल हातागळे, जिल्हा उपाध्यक्ष अस्लम पठाण, प्रसिद्धी प्रमुख अविनाश घणघावं, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अजय वाघमारे, तालुका उपाध्यक्ष प्रदीप वाघमारे,तालुकाध्यक्ष खाजमिया पठाण, सरपंच प्रशांत गंगणे, उपसरपंच नीलकंठ गंगणे, बबरूवान बनसोडे, सदस्य उमेश गंगणे, नितीन वाघमारे, सिद्धार्थ बनसोडे, बाळासाहेब गंगणे आदी उपस्थित होते.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!