9.8 C
New York
Friday, May 23, 2025

Buy now

spot_img
spot_img

पंकजाताई तुम्ही मंत्री असतांना व बहीण खासदार असतांना जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या रेल्वेचे काम धिम्या गतीने का झाले?- मिनाक्षी डोमाळे

  • पंकजाताई तुम्ही मंत्री असतांना व बहीण खासदार असतांना जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या रेल्वेचे काम धिम्या गतीने का झाले?- मिनाक्षी डोमाळे
  • 15 वर्ष गल्ली ते दिल्ली तुमच्याकडे सत्ता असतांना आणखीन 5 वर्ष कशासाठी?
  • बीड प्रतिनिधी:-लोकसभा निवडणुकीचा सध्या सर्वत्र प्रचार सुरु असतांना महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी प्रचारामध्ये 5 वर्ष विकासासाठी मागितले आहेत परंतू 15 वर्षामध्ये पंकजाताई तुम्ही एकवेळा आमदार, एकवेळा मंत्री तसेच प्रितमताई या 2 वेळा खासदार राहिल्या म्हणजे गल्ली ते दिल्ली सत्ता तुमच्याकडे असतांना तुम्ही आणखीन 5 वर्ष कशासाठी मागता तसेच तुम्ही मंत्री असतांना व बहीण खासदार असतांना बीडकरांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या रेल्वेचे काम केवळ 61 कि.मी.चेच झाले म्हणजे 10 वर्षात 61 कि.मी.चे तर आणखीन 5 वर्षात बीडपर्यंत तरी रेल्वे येईल का नाही हे तरी कळू द्या त्यामुळे एकवेळ संधी इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांना द्या असे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या प्रदेश संघटन सचिव मिनाक्षी डोमाळे यांनी पत्रकाद्वारे म्हटले आहे.
  • पुढे दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पंकजाताई व प्रितमताई दरवेळेस प्रचारामध्ये भावनिक आवाहन करुन जनतेला मतदान मागतात. परंतू ताई असे जनतेला कितीदिवस मत मागणार? 15 वर्ष सत्ता तुमच्याकडे असतांना रेल्वे का आली नाही, बीडमध्ये एखादा कारखाना का उभा राहिला नाही, एम.आय.डी.सी. बीडमध्ये का उभी राहिली नाही, बीडमधील असंख्य तरुण आजही बेरोजगार का राहिले? तसेच ओबीसी भगिनी आणि बांधवांसाठी 15 वर्ष काय केले ? असा सवाल मिनाक्षी डोमाळे यांनी केला आहे त्यामुळे सुजान जनतेने यावेळी कसल्याही भावनिक आवाहनाला बळी न पडता महाविकास आघाडीचे बजरंग बप्पा सोनवणे यांनाच मतदान देवून लोकसभेत पाठवावे असे आवाहन मिनाक्षी डोमाळे यांनी केले आहे. तसेच धनगर समाजाचे मतदान देखील आम्ही इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांनाच देणार आहोत त्यामुळे यावेळी 100 टक्के तुतारी वाजणार असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!