13.6 C
New York
Sunday, May 25, 2025

Buy now

spot_img
spot_img

बुधवारी खर्डेवाडी येथे भव्य दिव्य लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम…

बुधवारी खर्डेवाडी येथे भव्य दिव्य लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम…

संत महतांची कार्यक्रमास राहणार उपस्थिती..

बीड प्रतिनिधी – बीड तालुक्यातील खर्डेवाडी या ठिकाणी श्रीराम नवमीनिमित्त लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. खर्डेवाडी गावात गेल्या सहा महिन्यापासून भावार्थ रामायण वाचन सुरू आहे. बुधवार दिनांक १७ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता ग्रंथ वाचनास सुरुवात होणार आहे व गुरुवार दिनांक १८ एप्रिल सकाळी ठीक ६ वाजता भगवान श्रीरामाची महाआरती होऊन महाप्रसाद वाटप होईल. या भव्य लक्ष्मण शक्तीच्या रामायण ग्रंथ वाचण्यासाठी खर्डेवाडी तसेच पंचक्रोशीतील वाचक सुचक, भाविक भक्त, राम भक्त यांनी हजेरी लावावी व कार्यक्रमाची शोभा वाढवावी. या भव्य दिव्य लक्ष्मण शक्ती कार्यक्रम सोहळ्यास ह.भ. प. महादेव महाराज तात्या श्री क्षेत्र चाकरवाडी, ह.भ.प. लक्ष्मण महाराज मेंगडे बंकटस्वामी मठ, संस्थान श्री क्षेत्र निनगुर, ह.भ.प. नारायण गिरी महाराज श्री क्षेत्र उत्तरेश्वर पिंपरी, ह.भ.प रतन महाराज एकनाथ महाराज मठ संस्थान श्री क्षेत्र सासुरा, ह.भ.प. श्रीराम महाराज विडेकर, ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज श्री क्षेत्र बरड, ह.भ.प ज्ञानेश्वर माऊली महाराज मंझरीकर, ह.भ.प. किसन महाराज पवार मुकुंदराज संस्थान अंबाजोगाई, ह भ.प भगवान महाराज वरपगावकर, ह.भ.प. नाना महाराज कदम, ह.भ.प राजेन महाराज भोसले, ह.भ.प. श्री बिबीशन महाराज भोसले तसेच परिसरातील इतर संत महंत उपस्थित राहणार आहेत तरी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या लक्ष्मण शक्तीचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे गावकऱ्यांच्या व भजनी मंडळ खर्डेवाडी यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!