12.4 C
New York
Sunday, May 25, 2025

Buy now

spot_img
spot_img

पंकजाताई मुंडेंच्या प्रचार नियोजनार्थ महायुतीची गुरुवारी बीडमध्ये महत्वपूर्ण बैठक

पंकजाताई मुंडेंच्या प्रचार नियोजनार्थ महायुतीची गुरुवारी बीडमध्ये महत्वपूर्ण बैठक

धनंजय मुंडे, पंकजाताई, यांसह जिल्ह्यातील सर्व आमदार, मान्यवर नेते व महायुतीतील पदाधिकारी राहणार उपस्थित..

भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिपाइं (आठवले गट), रिपाइं (कवाडे गट), रासप यांसह महायुतीतील घटक पक्षांच्या सर्व आघाड्या, फ्रंटल सेल आदींच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे प्रचार समितीचे आवाहन

बीड प्रतिनिधी – बीड लोकसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व घटक पक्ष महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचाराच्या नियोजनार्थ गुरुवार (दि.11) रोजी बीड शहरातील तेलगाव रोडवरील कोहिनुर लॉन्स येथे महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, या बैठकीस राज्याचे कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे तसेच लोकसभेच्या उमेदवार तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे या मार्गदर्शन करणार आहेत, तसेच या बैठकीत आगामी काळातील प्रचाराचे नियोजन करण्याबाबत सविस्तर चर्चा होणार आहे.

या बैठकीस दोन्हीही नेत्यांसह बीड जिल्ह्यातील भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रीय समाज पक्ष, रिपब्लिकन पार्टी (आठवले गट), रिपब्लिकन पार्टी (कवाडे गट), बहुजन विकास मोर्चा यांसह महायुतीतील घटक पक्षाचे प्रमुख मान्यवर नेते त्याचबरोबर महायुतीचे सर्व आमदार-लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नेते, समन्वयक, विविध आघाडी व फ्रंटल सेलचे पदाधिकारी आदी उपस्थित राहणार आहेत.

ही बैठक बीड शहरातील तेलगाव रोडवरील कोहिनुर लॉन्स या ठिकाणी सायंकाळी 4 वा. आयोजित करण्यात आली असून, महायुतीतील सर्व घटक पक्षांचे मान्यवर नेते, पदाधिकारी, सर्व आघाडीचे व फ्रंटल सेलचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन पंकजाताई मुंडे प्रचार समितीच्या वतीने भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड.राजेश्वर चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप, कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, रिपाइंचे पप्पू कागदे, रिपाइं कवाडे गटाचे अनिल तुरूकमारे, रासपचे जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब मतकर, कपिल गाडेकर यांनी केले आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!