24.2 C
New York
Friday, July 18, 2025

Buy now

spot_img
spot_img

माविआ कडून डॉ. ज्योती मेटे की बजरंग सोनवणे ?

माविआ कडून डॉ. ज्योती मेटे की बजरंग सोनवणे ?

पंकजा मुंडे यांना प्रतिस्पर्धी उमेदवार कोण..

बीड प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे, महाविकास आघाडी आणि महायुतीकडून उमेदवारांची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे. मात्र अद्यापही असे काही मतदासंघ आहेत, जिथे अजूनही तिढा सुटला नसल्यानं उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाहीये.बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून यावेळी पंकजा मुंडे यांना तिकीट देण्यात आलं आहे. तर महाविकास आघाडीकडून अद्यापही उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाहीये. महाविकास आघाडीकडून बीडमधून निवडणूक लढवण्यासाठी बजरंग सोनवणे आणि ज्योती मेटे हे इच्छूक आहेत. बीडचा लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला आला आहे. या मतदारसंंघात कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत सध्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांकडून चाचपणी सुरू आहे.

 

दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे ज्योती मेटे या बीड लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असून, त्यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांची भेट घेतली आहे. काल मुंबईत ज्योती मेटे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मात्र बजरंग सोनवणे यांच्यासाठी आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तर शरद पवार हे ज्योती मेटे यांच्यासाठी अनुकूल आहेत.

 

सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे शरद पवार हे ज्योती मेटे यांच्यासाठी अनुकूल आहेत. तर जयंत पाटील हे बीडमधून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात यावी यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे आता बीडमधून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा प्रतिस्पर्धी उमेदवार कोण असणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!