16.7 C
New York
Thursday, May 9, 2024

Buy now

श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थान ते श्रीक्षेत्र पैठण पायी दिंडी सोहळ्याचे लिंबागणेश येथे जल्लोषात स्वागत 

  • श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थान ते श्रीक्षेत्र पैठण पायी दिंडी सोहळ्याचे लिंबागणेश येथे जल्लोषात स्वागत 
  • लिंबागणेश:– संत एकनाथ महाराज षष्ठी सोहळा प्रित्यर्थ सालाबादप्रमाणे यावर्षी बीड तालुक्यातील बेलगाव येथील श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थानची श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थान ते श्रीक्षेत्र पैठण पायी दिंडी सोहळ्याचे मठाधिपती श्री.ह.भ.प.महंत महादेव बाबा भारती आणि श्री.ह.भ.प‌.शांतीब्रम्ह तुकाराम महाराज भारती यांच्या मार्गदर्शनाखाली काल दि.२५ सोमवार रोजी सकाळी श्रीक्षेत्र बेलेश्वर व श्रीगुरू ईश्वर बाबा भारती यांचा अभिषेक करुन प्रस्थान झाले.पायी दिंडीचे १० वे वर्ष असून मोठ्या संख्येने भाविक यात सहभागी झाले होते. बेलगाव ते मुळुकवाडी मार्गे ईश्वरभारती बाबांच्या जन्मगावी लिंबागणेश या ठिकाणी दिंडीचे मुख्य प्रवेशद्वारावर आतिषबाजी करुन फुलांनी सजवलेल्या आकर्षक रथामध्ये विराजमान महंत महादेव भारती व महंत तुकाराम भारती महाराज यांचे शाल श्रीफळ, पुष्पहार घालून स्वागत करत सवाद्य बँड बाजा पथकासह भाविकांनी मिरवणूक काढली.यावेळी सुवासिनींनी पाद्यपुजन करत ओवाळले. स्वागतासाठी सरपंच बालासाहेब जाधव, उपसरपंच बाळकृष्ण थोरात, दामु थोरात, पांडुरंग वाणी, विक्रांत वाणी, संतोष वाणी, अर्जुन घोलप, बाबु वाणी, शिवहारी कोटुळे, गणपत तागड, भगवान मोरे, अँड.गणेश वाणी व,अनंतकाका मुळे,गणपत घोलप,दशरथ दशमे,विनायक वाणी,प्रकाश वायभट, विश्वंभर गिरी,आदि भाविक उपस्थित होते.बेलेश्वर मंदिराच्या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने चहा,नाष्टा पाण्याची सोय करण्यात आली होती.
  •  पायी दिंडी सोहळा दि.२५ मार्च ते २ एप्रिल दरम्यान होत असुन पायी दिंडीचा बेलखंडी,बेलुरा र,फुलसांगवी,अर्धंपिंपरी,मुंगी, पैठण याठिकाणाहुन प्रवास होऊन पायी दिंडी दि.१ एप्रिल रोजी पैठण येथे मुक्कामी पोहोचणार आहे. दि.२ एप्रिल रोजी ह.भ.प. शांती ब्रम्ह तुकाराम महाराज भारती यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता होणार आहे. नाथषष्ठी सोहळ्यांमध्ये भजन किर्तन क ,भारुड संगीत भजन आदि कार्यक्रम संपन्न होतात.जेवणाची आणि राहण्याची मोफत व्यवस्था संस्थानच्या वतीने केली जाते. शांती ब्रम्ह तुकाराम महाराजांच्या अथक प्रयत्नांमुळे पंचक्रोशीतील भाविक पायी दिंडी सोहळ्यात मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहेत.याबद्दल सरपंच बालासाहेब जाधव , डॉ.गणेश ढवळे, हरिओम क्षीरसागर, विक्रांत वाणी यांनी महंतांचे आभार मानले.यावेळी नेकनुर पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक आप्पासाहेब रोकडे,लिंबागणेश पोलिस चौकीचे पो.हे बाबासाहेब डोंगरे , ढाकणे आदी हजर होते.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!