32.4 C
New York
Sunday, July 20, 2025

Buy now

spot_img
spot_img

पालकमंत्री महोदय बौद्ध समाजाच्या संतापाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा- पॅंथर जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे

  • पालकमंत्री महोदय बौद्ध समाजाच्या संतापाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा- पॅंथर जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे
  • बीड प्रतिनिधी: आपला देश सर्वधर्मसमभाव या पद्धतीने चालतो मात्र बीडमध्ये तसं होताना दिसत नाही. आपण कुठल्यातरी एका विशिष्ट धर्माला झुकतं माप देत असल्याचं दिसून येत आहे लोकप्रतिनिधी हे सर्व धर्माचे असतात त्यांनी सर्वांना समान वागणूक समान सोयीसुविधा दिल्या पाहिजेत.
  • मात्र आपल्याकडून सर्व धर्मीयांना समान सोयीसुविधा दिल्या जात नसल्याचं दिसून येत आहे मागच्या काही वर्षांपूर्वी आमच्या निदर्शनास आलेलं आहे आपण दोन वेळा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेला आहात त्या काळामध्ये आपण काही विशिष्ट धर्माच्या धार्मिक स्थळांना भरीव निधी दिलेला आहे मात्र बौद्ध समाजाच्या धार्मिक स्थळांना कुठल्याही प्रकारचा निधी आपण दिला नाही ही खेदाची बाब आहे.
  • माननीय पालकमंत्री महोदय आपण आपल्या भाषणामध्ये नेहमी म्हणत असता माझ्यासारखा धार्मिक जिल्ह्यात कुणीच सापडणार नाही. धार्मिक असणं हा काही गुन्हा नाही, प्रत्येकाला आपआपल्या धर्माचा प्रसार प्रचार करण्याचा अधिकार आहे. मात्र आपण एक लोकप्रतिनिधी आहात सर्वांना समान वागणूक आपल्याकडून मिळणे आवश्यक आहे. कारण आपण जिल्ह्याचे पालक आहात आणि पालकाने कुटुंबातील सर्व सदस्यांना समान वागणूक दिली पाहिजे मात्र आपण दुधाभाव करत असल्याचं दिसून येत आहे.
  • यावरून बौद्ध समाजामध्ये संताप व्यक्त केला जात आहे त्यांच्याकडून सवाल उपस्थित केले जात आहेत की आम्ही या देशाचे किंवा या जिल्ह्याचे रहिवासी नाहीत का? आम्ही मतदार नाहीत का आम्ही तुम्हाला यासाठी मते दिले का? असे एक ना अनेक सवाल समाजातून उपस्थित केले जात आहेत आपण याची गांभीर्याने दखल घ्यावी अन्यथा येणाऱ्या काळात आपल्याला बौद्ध समाजाच्या संतापाला सामोरे जावं लागणार आहे याची नोंद घ्यावी असे ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी म्हटले आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!