19 C
New York
Monday, May 20, 2024

Buy now

पंकजा मुंडेंना मराठा समाजाने दाखवले काळे झेंडे…!

  • पंकजा मुंडेंना मराठा समाजाने दाखवले काळे झेंडे…!

एक मराठा लाख मराठा अशा घोषणा…

बीड प्रतिनिधी – भारतीय जनता पार्टीच्या बीड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार पंकजा मुंडे यांना प्रचारादरम्यान मराठ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. बीड जिल्ह्यामधील वेगवेगळ्या गावांना गाठीभेटी देणं सुरु आहे.

पंकजा मुंडेंनी प्रचाराला सुरुवात केली असून त्यानिमित्तानेच त्या धाकटी पंढरी नावाने प्रसिद्ध असलेल्या श्रीश्रेत्र संस्था नारायणगडमधील श्रीनगर नारायण महाराजांचे दर्शन घेण्यासाठी आल्या होत्या. दर्शन घेऊन पंकजा मुंडे गडावरुन खाली उतरताना साक्षाळ पिंपरी येथे मराठा बांधवांनी काळे झेंडे दाखवले. यावेळेस ‘एक मराठा लाख मराठा’ अशी घोषणाबाजीही करण्यात आली. मात्र पंकजा यांचा ताफा न थांबता येथून निघून गेला.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!