30.3 C
New York
Monday, July 21, 2025

Buy now

spot_img
spot_img

मनोज जरांगेंच्या आवाहनाला मराठा समाजाचा पाठिंबा,माऊली चौक येळंब घाट येथे रास्ता रोको…

  • मनोज जरांगेंच्या आवाहनाला मराठा समाजाचा पाठिंबा,माऊली चौक येळंब घाट येथे रास्ता रोको…
  • ♦️उपसंपादक-दिपक वाघमारे
  • बीड प्रतिनिधी:– माऊली चौक येळंब घाट येथे मराठा समाजाच्या वतीने आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मनोज जरांगे-पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘एक मराठा, लाख मराठा’ कोण म्हणतोय देत नाय, घेतल्याशिवाय रहात नाय या अशा घोषणा देत मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानुसार माऊली चौक येळंब घाट येथे राज्यमहामार्ग रोखला..
  • पोलिस प्रशासनाच्या मध्यस्थिनंतर काही काळात महा मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरु करण्यात आली. राज्य सरकारने दिलेले मराठा आक्षणात सग्यासोयऱ्यांचा समावेश करावा आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण सुरु केले आहे. त्यांनी शांततेत रास्ता रोको करण्याचे आवाहन राज्यातील मराठा समाजाला केले होते.
  • त्याला पाठिंबा देण्यासाठी बालाघाट मराठा बांधवांच्या वतीने माऊली चौक येळंब घाट येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. काही काळ आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी आंदोलनकांना रास्ता रोको थांबवण्याचे आवाहन केले. प्रवाशांची होणारी गैरसोयीचा विचार करुन मराठा बांधवांनी काही काळानंतर रास्तारोको स्थगित केला आणि नेकनुर पोलीस स्टेशन चे अधिकारी मुकुंद ढाकणे, मंडळ अधिकारी आघाव मॅडम आणि तलाठी प्रशांत नलवडे यांना निवेदन देऊन रस्ता रोको थांबवला…

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!