15.2 C
New York
Monday, May 20, 2024

Buy now

मनोज जरांगेंच्या सहकाऱ्याच्या गाडीवर हल्ला, अज्ञातांकडून वाहनाची तोडफोड..

  • मनोज जरांगेंच्या सहकाऱ्याच्या गाडीवर हल्ला, अज्ञातांकडून वाहनाची तोडफोड..
  • मराठा आंदोलन चिरडण्याचा डाव – गंगाधर काळकुटे
  • बीड प्रतिनिधी:- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्याच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे.
  • यावेळ वाहनाची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. गंगाधर काळकुटे हे मराठा आरक्षणाच्या आंदोलनात जरांगे यांचे सहकारी असून, त्यांच्यावर गाडीवर हा हल्ला झाला आहे. विशेष म्हणजे गाडीची तोडफोड केल्यावर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या आंदोलनातील सहकारी असलेले बीड येथील गंगाधर काळकुटे यांच्या गाडीवर रात्री अज्ञातांनी हल्ला करून गाडीची तोडफोड केली आहे. गंगाधर काळकुटे हे रात्री मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी गेले होते. जरांगे यांची भेट घेऊन परत येत असताना वडीगोद्री गावाजवळ एका हॉटेलवर चहा पिण्यासाठी ते थांबले होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी त्यांच्या फॉर्च्युनर गाडीच्या काचा फोडल्या. गाडीवर हल्ला केल्यावर दोनही अज्ञातांनी तेथून पळ काढला. त्यामुळे घटनास्थळी काही काळ वातावरण तापले होते. मात्र, हा हल्ला कोणी आणि का केला याबाबत अजूनही कोणतेही माहिती समोर येऊ शकलेली नाही.
  • मराठा आंदोलन चिरडण्याचा डाव… 
  • दरम्यान या सर्व घटनेनंतर गंगाधर काळकुटे यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. “ मराठा आरक्षणाबाबत सुरु असलेलं आंदोलन चिरडण्याचा हा डाव आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. तसेच, आंदोलन चिरडण्यासाठी कोणी कितीही प्रयत्न केले तरी शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आहोत आणि मराठा आरक्षणाची लढाई कायम सुरू ठेवणार असल्याचं म्हणाले.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!