26.6 C
New York
Sunday, July 20, 2025

Buy now

spot_img
spot_img

मकर संक्रांतीच्या निमित्ताने धर्मवीर संभाजी विद्यालयात हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न…

मकर संक्रांतीच्या निमित्ताने धर्मवीर संभाजी विद्यालयात हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न…

विधवा महिलांचा हळदी कुंकू लावून करण्यात आला सन्मान..

करमाळा प्रतिनिधी – दिनांक ३१ रोजी गौंडरे येथिल धर्मवीर संभाजी विद्यालयात मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात महिलांसाठी विविध स्पर्धात्मक खेळांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमामध्ये विषेश म्हणजे विधवा महिलांनी कुंकू न लावण्याच्या पद्धतीवर बहिष्कार टाकत अशा महिलांना कुंकू लावून त्याचा सन्मान करण्यात आला. यावेळी वैशाली गायकवाड, व निशा सोनवणे यांचा कुंकू लावून मानसन्मान करण्यात आला.

 

तसेच या कार्यक्रमात महिलांचे आरोग्य तपासणी, बेटी बचाव, महिला सबलीकरण, लेक शिकवा अभियान, पर्यावरण विषयक माहिती, लेकीच्या जन्माचे स्वागत, अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. यासाठी करमाळा येथिल सामाजिक कार्यकर्त्या मा.अंजली श्रीवास्तव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

 

या कार्यक्रमात महिलांसाठी सुतळीच्या गाठी बांधणे, तळ्यात मळ्यात, उखाणे, टायर मधुन चेंडू फेकणे, लिंबू चमचा,व संगित खुर्ची हे खेळ घेण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक सौं.ऋतुजा मनोज नलवडे यांचा आला असुन मानाची पैठणीच्या विजेत्या ठरल्या तर दुसरा क्रमांक सौं.पुजा गणेश जाधव यांचा आला असुन त्यांनी दुसरे बक्षीस असलेली सोन्याची नथ मिळवली व तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस असलेले चांदीचा करंड मिळविण्याचा मान सौं.कवीता नागनाथ नलवडे यांना मिळाला.

 

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे चेअरमन प्रा.गणेश करे पाटील उपस्थित होते. त्यांनीही उपस्थित महिलांना व विद्यार्थ्यांना जिवनात यशस्वी होण्याचे मार्ग सांगत मोलाचे मार्गदर्शक केले. तसेच या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.अश्विनी निळ उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन धर्मवीर संभाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बापु निळ सर, सचिव काळे सर, गिलबिले सर, जावळे सर, मुळिक सर, पुराने सर, कोळेकर सर, हनपुडे सर, भौईटे सर, व्ही.डी.निळ सर, श्रीकांत नलबे, प्रकाश साळवे, बापु तांबोळी,व सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी केले होते.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!