जिल्ह्यातील सरपंच,ग्रामरोजगार सेवक,ग्रामसेवक,संगणक ऑपरेटर संपावर.!
- जिल्ह्यातील सरपंच,,ग्रामरोजगार सेवक, ग्रामसेवक, संगणक ऑपरेटर संपावर.!
- पंचायत समिती कार्यालयासमोर विविध मागण्यासाठी ठिय्या आंदोलन..
- ♦️निवासी संपादक-दिपक वाघमारे
- बीड दि,18 : जिल्ह्यातील सरपंच,उपसरपंच, ग्रामरोजगार सेवकांच्या मानधनात वाढ करण्यात यावी यासह विविध मागण्यासाठी बेमुदत आंदोलन सुरू असून पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
- यावेळी ठिय्या आंदोलनात अनेकांची मोठया संख्येने उपस्थिती होती. ग्रामपंचायत सदस्यांचा भत्ता, सरपंच, उपसरपंच यांचे थकीत मानधन तात्काळ अदा करण्यात यावे यासह विविध मागण्यासाठी बीड जिल्ह्यातील 1033 ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामरोजगार सेवक, ग्रामसेवक, ऑपरेटर बेमुदत संपावर गेले असून तालुक्यातील ग्रामसेवक, ग्रामरोजगारसेवकांनी पंचायत समिती कार्यालयासमोर आज ठिय्या आंदोलन केले. यावेळी अनेकांची उपस्थिती मोठ्या संख्येने दिसून आली.
error: Content is protected !!