17.2 C
New York
Friday, May 17, 2024

Buy now

बीड शहरातील गांधीनगर परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट.!

  • बीड शहरातील गांधीनगर परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट.!
  • बीड प्रतिनिधी : बीड शहरातील गांधीनगर भागात मोकाट कुत्र्यांची दहशत मोठ्या प्रमाणावर वाढलेली असून  या परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट चालू आहे.गांधीनगर परिसरातील जेष्ठ नागरिक,महिला,शाळेतील विद्यार्थी,लहान मुलें यांच्या  मध्ये मोकाट कुत्र्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले असून यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
  • तरी समस्त गांधीनगर भागातील नागरिकांची मागणी आहे की, नगरपालिकेने तात्काळ गांधीनगर भागात डॉग व्हॅनची व्यवस्था करून लवकरात लवकर या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी राम दादा वाघमारे यांच्या वतीने केली आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!