लढा दुष्काळाशी फाउंडेशन आयोजीत विविध सामाजिक उपक्रमाद्वारे पत्रकार अभिजीत पवार यांचा वाढदिवस साजरा..
- लढा दुष्काळाशी फाउंडेशन आयोजीत विविध सामाजिक उपक्रमाद्वारे पत्रकार अभिजीत पवार यांचा वाढदिवस साजरा..
- ♦️निवासी संपादक-दिपक वाघमारे
- बीड,दि ३०:– बीड तालुक्यातील एका छोट्याशा खेड्यात बीड शहरात येऊन अगदी दोन वर्षात पत्रकारिता क्षेत्रात नावारूपाला आलेले पत्रकार अभिजीत पवार यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आला आहे. लढा दुष्काळाशी फाउंडेशन चे संस्थापक तसेच तिगाव चे सरपंच राज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार अभिजीत पवार यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला आहे.
- दैनिक बीड माऊली चे संपादक अभिजीत पवार यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त होणार्या खर्चाला फाटा देत समाज प्रति असलेली जाणीव दाखवत आगळावेगळा उपक्रम राबवित आपल्या वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाकरवाडी आणि आपला परिवार वृद्ध आश्रमात जेष्ठ पत्रकार बांधवांच्या हस्ते लढा दुष्काळाशी फाउंडेशन ने वयोवृद्ध आजी-आजोबांना आणि विद्यार्थ्यांना खाऊ वाटप , शालेय साहित्य वाटप केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, फळ वाटप आणि वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच आपला परिवार वृद्धाश्रम या ठिकाणी आजी – आजोबा सोबत पत्रकार अभिजीत पवार यांनी राज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाढदिवस साजरा केला. पत्रकार अभिजीत पवार यांनी बोलताना सांगितले की माझा वाढदिवस हा मी प्रत्येक वर्षी सामजिक उपक्रमाने साजरा करणार असल्याचे बोलताना म्हटले आहेत.
- यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तिगाव चे सरपंच राज पाटील, युवा पत्रकार अंकुश गवळी, पत्रकार अशोक काळकुटे, पत्रकार गणेश चक्रे, माऊली कॉम्प्युटर संचालक महारुद्र वाणी सर, ज्ञानदीप कोचिंग क्लासेस संचालक तुळजिराम शिंदे सर, रायचंद कापसे शिवसंग्राम नेते, गोरक्षनाथ कदम शिवसेना तालुका संघटक, महादेव मुळे उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तालुका संघटक, धम्मदिप वंजारे, अभिषेक भावले , दिपक अनवने, पत्रकार अंगद मोहिते आणि मित्र परिवार मोठया संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!