22.5 C
New York
Sunday, May 19, 2024

Buy now

एकता मराठी साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्ष पदी प्रा.डाॅ.भास्कर बडे यांची निवड

  • एकता मराठी साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्ष पदी प्रा.डाॅ.भास्कर बडे यांची निवड
  • शिरूर कासार (प्रशांत बाफना):- गोमळवाडा येथे होणाऱ्या ६ वे एकता मराठी साहित्य संमेलनाच्या पुर्वतयारी आणि संमेलनाध्यक्ष निवडीसंदर्भात एकता फाउंडेशन महाराष्ट्र राज्य केंद्रीय कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच संपन्न झाली असून या बैठकीत गोमळवाडा येथील राज्यस्तरीय एकता मराठी साहित्य संमेलनाच्या पुर्वतयारीचा आढावा घेण्यात आला.
  • साहित्य संमेलन यशस्वीपणे संपन्न व्हावे यासाठी या संमेलनाचे स्वागताध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते आजिनाथ गवळी यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या महिनाभरापासून बैठका सुरू आहेत. दि.२९ रोजी एकता फाउंडेशन च्या कोअर कमिटीच्या बैठकीत अनेकविध विषयांवर चर्चा झाली. सदर बैठकीत मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद चे मा.कोषाध्यक्ष तथा ग्रामीण कथाकार प्रा.डाॅ.भास्कर बडे यांची सर्वानुमते निवड झाल्याचे एकता फाउंडेशन च्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
    यावेळी आदर्श शिक्षक, आदर्श पत्रकारिता, आदर्श सामाजिक कार्यकर्ता आणि जीवन गौरव पुरस्कारार्थींची नावे सुद्धा चर्चेअंती एकमताने अंतिम करण्यात आली. कविसंमेलन, कथाकथन आणि परिसंवाद सत्रांचे अध्यक्ष यांच्या नावांवरही विचारमंथनाद्वारे शिक्कामोर्तब झाले. ‘लेखक आपल्या भेटीला’ या सदरातील पाठ्यपुस्तकातील कवी, लेखक यांच्या नावांवरही सविस्तर मंथन झाले.
  • या बैठकीसाठी ६ वे एकता मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते अजिनाथ गवळी, संस्थापक अध्यक्ष साहित्यिक अनंत कराड, सचिव पत्रकार गोकुळ पवार, उपाध्यक्ष प्राचार्य माही शेख, कोशाध्यक्ष शिवलिंग परळकर, निमंत्रित सभासद से.नि.केंद्रप्रमुख जालिंदर तावरे, सामाजिक कार्यकर्ते समीर पठाण, व्यंगचित्रकार दिपक महाले, संस्थापक सदस्य लखुळ मुळे, प्रा.महेश नागरे, कैलास खेडकर फौजी, एकता फाउंडेशन महाराष्ट्र राज्य युवा आघाडीचे प्रदेश निमंत्रक कवीवर्य इम्रान शेख, एकता फाउंडेशन महाराष्ट्र राज्य चे प्रदेश संघटक कवीवर्य देवीदास शिंदे, महिला आघाडीच्या प्रतिनिधी श्रीमती लता बडे-कराड, महादेव कातखडे, अनिकेतभैया ढाकणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!