एकलव्य उच्च माध्यमिक विद्यालयाचे बारावी बोर्ड परीक्षेत यश …
गितांजली लव्हाळे वडवणी प्रतिनिधी :-
एकलव्य उच्च माध्यमिक विद्यालय चिखलबीड या विद्यालयाने एच .एस .सी बोर्ड परीक्षा 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये उज्वल निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. विज्ञान शाखेचा निकाल ९६.५ टक्के लागला आहे तर कला शाखेचा निकाल 92. 10 टक्के लागला आहे उच्च माध्यमिक विद्यालयाचा एकूण निकाल ९४.७३ टक्के लागला आहे. विज्ञान शाखेमधून बोंदर अविनाश अशोक हा विद्यार्थी 88.33% गुण घेऊन प्रथम आला आहे तर आंधळे साक्षी बालासाहेब 87.17% गुण घेऊन द्वितीय, चव्हाण शाम शिवाजी 84.33% गुण घेऊन तृतीय, दराडे साक्षी महादेव ८२ टक्के गुण घेऊन चतुर्थ ,आंधळे हर्षवर्धन रमेश ८०.५० टक्के गुण घेऊन पाचवा आला आहे. तर कला शाखेमधून मुंडे अश्विनी प्रकाश 74.17% मेटे दिपाली नवनाथ ७३ टक्के, कर्नोर प्रभा प्रभू ७२.८३ टक्के गुण घेऊन अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय आले आहेत. तेरा विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण आहेत तर 82 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहे. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्ष प्रा. सुशीला ताई मोराळे मॅडम, डॉ. अजित पाखरे , श्री शिवराज पाखरे, प्राचार्य श्री कानडे सर ,प्रा. श्री चंदनशिव सर ,आघाव सर , बोंदर सर साखरे सर , चोले सर, चव्हाण सर ,सानप सर ,आंधळे सर, बारगजे सर , प्रा.लव्हाळे सर, सोनवणे सर ,गवारे सर, यादव सर , श्रीमती देशमुख मॅडम, बालासाहेब नेहरकर ,तोगे मॅडम, चिखल बीड चे सरपंच उपसरपंच व गावातील व्यक्तींनी अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.