14.3 C
New York
Monday, May 20, 2024

Buy now

गेवराई नगर परिषदेत लाखोंचा भ्रष्टाचार उघडकीस

गेवराई नगर परिषदेत लाखोंचा भ्रष्टाचार उघडकीस

============================

दोषींविरुद्ध कारवाई करण्यासाठी राष्ट्रवादीकडुन अंदोलनाचा इशारा :- युवानेते वसीम फारोकी 

============================

गेवराई :- सोमनाथ मोटे सह शाम जाधव

गेवराई नगर परिषदेतील आर्थीक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या संदर्भात लेखा परिक्षकांनी सातत्याने मागील अनेक वर्षांपासुन गंभीर आक्षेप नोंदविले होते. भ्रष्टाचाराने बरबटलेल्या अधिकारी आणि पदाधिका र्‍यांनी या आक्षेपांकडे दुर्लक्ष करत लाखो रुपयांचा अक्षरश: चुराडा केला. जिल्हाधिकारी, बीड यांच्या समोरील भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्यांनी पालीकेला दोषी ठरविले असुन भ्रष्टाचारास जवाबदार असणार्‍यां विरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकार्‍यांच्या याआदेशामुळे गेवराई नगरपरिष द आणि त्यांचे कर्तेधर्ते यांचे धाबे दणाणले असुन राजकीय दबावापोटी माहे डिसेंबर २०२२ पासुन अद्याप या प्रकरणात कोणतीही कारवाई होवु शकली नाही. गेवराई शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने प्रशासकांना लेखी निवेदन देवुन या प्रकरणात तात्काळ कारवाई न झाल्यास धरणे अंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

गेवराई नगर परिषदेत आरसीसी पाईप, ढापे, कुंड्या व पाणी पुरवठा टाकी खरेदीतील गैरव्यवहार, शहरातील कचरा गोळा करण्यासाठी बेकायदेशिर रितीने गेवराई भाग – १ व भाग – २ अशा एकाच कामाच्या दोन निवीदा करुन लाखोंची बोगस बिले अदाई, व्यापारी गाळ्यांच्या निविदेतील भ्रष्टाचार, शहरातील रस्त्ये डांबरीकरणाच्या कामातील गैरव्यवहार यासह ब्लिचींग पावडर व त्रुटी खरेदीतील भ्रष्टाचार अशा विविध प्रकरणात लाखो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचार पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी संगनमताने केल्याची पुराव्यनिशी तक्रार करण्यात आली होती. सन २०१६ पासुनच्या शासकीय लेखा परिक्षण अहवालात या बाबत गंभीर स्वरुपाचे आक्षेप नोंदविण्यात आले होते. सन २०१७-१८ च्या लेखा परिक्षण अहवालात लेखा परिक्षकांनी दोषींविरुद्ध कारवाई प्रस्तावित केली होती. मात्र राजकीय वरदहस्तामुळे गेवराई नगर परिषदेतील भ्रष्टाचाराच्या संदर्भात अद्याप कारवाई होवु शकली नाही. तक्रारदाराला वारंवार उच्य न्यायालयात दाद मागावी लागली. अखेर दि. २० डिसेंबर २०२२ रोजी जिल्हाधिकारी, बीड यांनी या प्रकरणात अंतीम आदेश पारित करुन गेवराई नगर पालिकेत भ्रष्टाचार झाल्याचे सांगुन दोषीविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्हाधिकार्‍यांसमोर प्रकरण सुरु असतांना तथाकथीत भ्रष्ट लोकांनी उचललेल्या लाखोंच्या रकमां चा कारवाईच्या धास्तीने शासन तिजोरीत भरणाकेला तरीही याभ्रष्ट कारभाराला जवाबदार असणार्‍यां विरु द्ध कारवाई करण्याचे सक्त आदेश जिल्हाधिकारी यां नी दिले आहेत. शहरातील गोर-गरीब व्यापार्‍यांचेअति क्रमण एकारात्रीत पाडणार्‍या कर्तव्यदक्ष प्रशासका समोर त्यांच्याच कार्यालयातील भ्रष्ट अधिकार्‍यांवर कारवाई करुन पुन्हा एकदा कर्तव्य तत्परता दाखवि ण्याची वेळ आली आहे.

मात्र या प्रकरणात कारवाईसाठी होत असलेलाविलंब लक्षात घेवुन गेवराई शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने प्रशासकांना लेखी निवेदन देवुन कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी सत्वर कारवाई न झाल्यास शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दिपक आतकरे, युवकचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश बेदरे, नगरसेवक शाम येवले, माजी उपनगराध्यक्ष शेख खाजाभाई,अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष खालेद कुरेशी, सय्यद नजीब, सर वर पठाण, गोरख शिंदे, संदिप मडके,समिर पठाण, अमित वैद्य, जयसिंग माने, गुफरान इनामदार, धमपाल भोले,वसीम फारोकी, शाम रुकर, गजानन काळे, अनिरुद्र चव्हाण, चक्रधर मोहिते, विलास धोंडे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!