वडवणी तहसिलच्या प्रांगणात पाच हजार झाडांच्या रोपांची निर्मिती होणार..!
इतर हि शासनाच्या योजना राबविल्या – संभाजी मंदे
वडवणी प्रतिनिधी :- विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या सुचनेवरुन आणि जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय आधिकारी बाफना मँडम यांच्या सहकाऱ्याने व वडवणीचे तहसिलदार संभाजी मंदे यांच्यासह सर्व प्रशासनाच्या वतीने कार्यालयाच्या प्रंगाणात तब्बल विविध झाडांचे ५ हजार रोपटे लावण्यात आले असून त्यांची चांगली देखभाल देण्यात येणार आहे.तर इतर हि शासनाच्या विविध योजना राबविण्यात आल्या असल्याची माहिती तहसिलदार संभाजी मंदे यांनी दिली आहे.
याबाबत आधिक माहिती अशी कि, समाजातील समस्याग्रस्त पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समाधान शिबिर वडवणी तहसिल कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झाले आहे.तर वडवणी मौजे देवडी ता.वडवणी येथेआज गाळमुक्त धरण व गाळ युक्त शिवार या अभियान अंतर्गत उद्घाटन करीत असताना मा.श्रीमती नीलम बाफना मॅडम उपविभागीय अधिकारी माजलगाव तसेच तहसीलदार संभाजी मंदे व गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे आदि जण उपस्थित होते. तर यांच्याच उपस्थित नोंदणी केलेल्या ऊसतोड कामगारांना ओळखपत्राचे वाटप देखील केले आहेत.तर विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या पुढाकारातून पहिल्यादाच महसुल विभागाने प्रत्येक तहसिल कार्यालयात ५ हजार विविध झाडांची लागवड करुन रोपवाटीका तयार केली आहे.तर हि झाडे जगविण्यासाठी विशेष काळजी देखील घेण्यात येणार आहे. अशी माहिती वडवणी तहसिलदार संभाजी मंदे यांनी दिली आहे.यावेळी वडवणी तहसिल कार्यालयाचे नायब तहसिलदार प्रकाश सिरसेवाड,संजय जिरांगे यांच्यासह मंडल आधिकारी,कारकून,तलाठीसह सर्वच आधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.