बीडमध्ये आज भगवे वादळ महाप्रबोधन यात्रेची आजची सभा रेकॉर्ड ब्रेक होणार – जिल्हाप्रमुख अनिल जगताप
प्रत्येक तालुक्यातून हजारो शिवसैनिक बीडमध्ये येणार
बीड प्रतिनिधी – शिवसेनेच्या कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी आणि जनतेचे प्रश्न समजुन घेण्यासाठी राज्यात महाप्रबोधन यात्रा काढण्यात आलेली आहे. या महाप्रबोधन यात्रेची आजची बीड येथे शेवटची सभा होत असून या सभेला शिवसेना नेते खा. संजय राऊत, उपनेत्या सुषमाताई अंधारे, माजी मंत्री चंद्रकांत खैरे उपस्थित राहणार असून या सभेसाठी जिल्हाभरातून किमान १० हजार लोक उपस्थित राहतील, शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी ही यात्रा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत असून जनसामान्यातून मोठ्या संख्येने या यात्रेबद्दल उत्सुक आहेत. ही सभा रेकॉर्ड ब्रेक होईल असे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी सांगितले.
बाज बीड येथे महाप्रबोधन यात्रा होत असून त्या अनुषंगाने सत्तासंघर्षानंतर बीड येथे शिवसेनेची महाप्रबोधन यात्रेनिमित्त पहिली सभा होत आहे. या सभेसाठी बीड येथे पहिल्यांदाच शिवसेना नेते संजय राऊत उपस्थित राहणार असून शिवसेनेच्या अभ्यासू वक्त्या तथा उपनेत्या सुषमाताई अंधारे यांचा बीड हा जिल्हा आहे त्यामुळे ही सभा भव्य-दिव्य होण्यासाठी
शिवसेनेचे सर्व पदाधिकारी एकदिलाने काम करत आहेत. सभेपुर्वी माजी आ. सुनिल दादा धांडे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील भव्य-दिव्य अशी + रॅली काढण्यात येणार आहे. या सभेला नागरिकांनी येण्यासाठी कोणावरही दबाव • टाकला जात नाही तर सत्ता संघर्षानंतर बीड येथे पहिल्यांदाच महाप्रबोधन यात्रेनिमित्त सभा होत असल्यामुळे नागरिकातच सभेबद्दल उत्सुकता असल्यामुळे सभा मोठी होणार आहे असेही अनिलदादा जगताप यांनी सांगितले.