निधन वार्ता । मराठा आरक्षणाचा आवाज हरपला…
संजय ( भाऊ ) सावंत यांचे उपचारादम्यान दुःखद निधन..
बीड प्रतिनिधी – मराठा क्रांती मोर्चचे राज्य समन्वयक तथा शिवक्रांती सेना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय ( भाऊ ) सावंत (वय ४०) यांचे आज दुपारी उपचारादरम्यान दुःखद निधन झाले आहे. त्यांच्यावर दोन दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दुपारी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
आज रविवार सायंकाळी ८ वाजता अंत्ययात्रा सुरु होणार असून त्यांचा शासकिय इतमातात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, वहिनी, पुतणे असा परिवार आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली आहेत. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केला. मराठा समाजासाठी दिवस-रात्र अहोरात्र कष्ट केले. स्वतःसाठी काही न करता समाजाच्या हितासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. कोरोना काळामध्ये गोरगरिबांना मदत केली. लोकांच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारा नेता म्हणजे संजय सावंत हे होते. तोंडोळी येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा बसवनारे मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक संजय सावंत हे होते.
निधनाचे वृत्त कळताच त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी सर्वपक्षीय नेते, हजारो कार्यकर्ते, समाजातील विविध स्तरांतील नागरिक मोठ्या संख्येने त्यांच्या निवासस्थानी एकत्र झाले आहेत.
मागील दोन दिवसांपासून संजय ( भाऊ ) सावंत हे आजारपणाशी झुंज देत होते. अखेर रविवारी (५ मार्च ) रोजी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यू समयी त्यांचे वय ४० होते. आज सायंकाळी ८ वाजता त्यांचा ससेवाडी येथे अंत्यविधी होईल, अशी माहिती नातेवाईकांनी दिली.