26.6 C
New York
Sunday, July 20, 2025

Buy now

spot_img
spot_img

शौर्य पुरस्कार प्राप्त रोहन बहिरने जिल्ह्याला नावलौकिक मिळवून दिला..डॉ.ज्योतीताईं मेटें

शौर्य पुरस्कार प्राप्त रोहन बहिरने जिल्ह्याला नावलौकिक मिळवून दिला..डॉ.ज्योतीताईं मेटें

 शौर्य पुरस्कार प्राप्त रोहन बहीरच्या पाठीवर डॉ.ज्योतीताईं मेटेंची कौतुकाची थाप.

” डॉ.ज्योतीताईं मेटेंच्या हस्ते रोहन बहिर सन्मानीत “

बीड प्रतिनिधी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता नदीच्या पुरात वाहून जाणाऱ्या महिलेचे प्राण वाचविले. या साहसी शौर्याबद्दल बीड तालुक्यातील नवगण राजुरी येथील रोहन रामचंद्र बहिर यास नवी दिल्ली येथे नुकतेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.या शौर्याबद्दल काल डॉ ज्योतीताई विनायकराव मेटे यांनी शिवसंग्राम भवन येथे चि. रोहन बहिर याचा सन्मान करत कौतुकाची थाप पाठीवर ठेवली व रोहनने जिल्ह्याला नावलौकिक मिळवून दिला अश्या शब्दात गौरव केला.

लोकनेते स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेब यांचा वैचारिक वारसा डॉ.ज्योतीताई मेटे सक्षमपणे चालवत आहेत .बीड जिल्ह्यातील रोहन रामचंद्र बहिर यास प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या हस्ते प्रदान झाला. रोहनने पुरात वाहून जाणाऱ्या महिलेचे प्राण वाचवले होते याबद्दल हा शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोहनचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. रोहन रामचंद्र बहिर याचा शिवसंग्राम भवन येथे यथोचित सन्मान करत कौतुकाची थाप पाठीवर ठेवन्यात आली. रोहनने देशांमध्ये बीड जिल्ह्याला नावलौकिक मिळवून दिला व देशातील 11 बाल पुरस्कारापैकी एक पुरस्कार महाराष्ट्राला प्रदान करत राज्याची व जिल्ह्याची मान उंचावली याबद्दल त्याचे कौतुक करन्यात आले. रोहन प्रमाणेच सर्व् मुलांनी शौर्यवान बनावे अशी अपेक्षा व्यक्त करत रोहन व त्याच्या पालकांचे अभिनंदन करन्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष नारायणराव काशीद,शिवसंग्राम नेते रामहरीभैया मेटे, जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे,शिवसंग्रामचे ऊसतोड कामगार नेते बबनराव माने ,सुहास पाटील,बीड तालुकाध्यक्ष नवनाथ प्रभाळे, सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष प्रा.पंडित शेंडगे,रोहनचे वडील श्री.रामचंद्र बहिर,ईश्वर पवार तथा बीड मधील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!