24.2 C
New York
Friday, July 18, 2025

Buy now

spot_img
spot_img

संत म्हणतात जिवापेक्षा आम्हाला देवाची गरज आहे ह. भ. प महादेव महाराज तात्या श्री क्षेत्र चाकरवाडीकर यांचे प्रतिपादन…!

संत म्हणतात जिवापेक्षा आम्हाला देवाची गरज आहे ह. भ. प महादेव महाराज तात्या श्री क्षेत्र चाकरवाडीकर यांचे प्रतिपादन…!

मुख्य संपादक – अभिजीत पवार 

बीड प्रतिनिधी – पांढऱ्याचीवाडी येथे प्रतिवर्षी प्रमाणे आयोजीत करण्यात येत असलेल्या अखंड हरीनाम सप्ताहाची दुसऱ्या दिवसाची किर्तन सेवा महादेव महाराज तात्या श्री क्षेत्र चाकरवाडीकर यांची सुश्राव्य असे किर्तन सेवा संपन्न झाली.

 

नामसंकीर्तन साधन पै सोपे । जळतील पापे जन्मांतरीची ||

 

न लगती सायास जावे वनांतरा । सुखे येतो घरा नारायण

 

ठायींच बैसोनि करा एकचित्त आवडी अनंत आळवावा ।। रामकृष्णहरी विठ्ठल केशवा । मंत्र हा जपावा सर्वकाळ ।। याविण आणिक असता साधन । वाहातसे आण विठोबाची ।। तुका म्हणे सोपे आहे सर्वांहूनि । शाहाणा तो धणी घेतो येथे ।।

 

तुकाराम महाराज म्हणतात की देवाला प्राप्त करून घेण्यासाठी नामसंकीर्तन हे साधन अतिशय साधे असून अत्यंत सोपे देखील आहे. त्याने मनुष्याची जन्मजन्मांतरीची पापे जळून खाक होतात, नष्ट होतात. ते म्हणतात परमार्थ करण्यासाठी किंवा साधण्यासाठी इथे कोणालाही कसलेच कष्ट उपसायची गरज लागत नाही की घरदार सोडून वनात जाण्याची गरज उद्भवत. ते म्हणातात वाचेने फक्त नाम घेतल्याने नारायण स्वतःहून आणि सुखाने आपल्या घरी चालत येतो. ते म्हणतात नाम घेण्यासाठी जर काही करावे लागत असेल तर ते फक्त शांत चित्ताने एकेठिकाणी असून आवडीने त्या अनंताला आळवावे, त्याचा नामाचा जयघोष करावा आणि रामकृष्णहरी विठ्ठल केशवा’ हा मंत्र सर्वकाळ जपावा.

 

ते पुढे सांगतात की देवप्राप्तीसाठी नामाशिवाय किंवा नामाखेरीज ह्या संसारात आणखी दुसरे कोणतेच साधन नाही आणि हे मी विठोबाची आण म्हणजेच शपथ घेऊन सांगतो.

 

तुकोबाराय शेवटी म्हणतात की परमार्थ मार्गातील इतर सांधनांमध्ये ‘नाम घेणे’ हे सर्वात सोपे आणि सुलभ साधन आहे. परंतु जो येथे शहाणा आहे तोच भाग्यवंत या मार्गाचा अवलंब करतो आणि मन भरेपर्यंत त्याचा आस्वाद घेतो.

 

महाराजांनी त्यांच्या गोड वाणीतून भाविक भक्तांना गोड असा संदेश दिला. गोड अश्या अभंगातून भाविक भक्त किर्तन एकूण भारावून गेले. आणि गोड वाणीतून भाविक भक्तांना मंत्रमुग्ध केले.

 

 

यावेळी मृदंगसाथ ह. भ. प अमोल महाराज पवार चाकरवाडीकर, आविष्कार महाराज क्षीरसागर, प्रशांत महाराज शेळके, गणेश महाराज भोसले, गायनाचार्य ह. भ. प अभिमान महाराज ढाकणे, ह. भ. प गणेश महाराज मुंडे शास्त्री रामकृष्ण गड संस्थान बरड, ह. भ. प त्रिंबक महाराज शेळके, ह. भ. प रोडे महाराज, ह. भ. प सुधाकर महाराज सिरसाठ, प्रशांत महाराज क्षीरसागर, रज्जाक महाराज तसेच महाराज मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते.

 

तसेच यावेळी चाकरवाडीचे आदर्श पोलिस पाटील नानासाहेब काकडे, राजेभाऊ शेळके, पत्रकार अभिजीत पवार, मंचीक पवार, बाबासाहेब मोरे, भोसले सर, अनावणे बप्पा चाकरवाडी, सरपंच नितिन बप्पा ताटे, मिथुन पवार, मुकिंदा शेळके, पांडुरंग शेळके, आशिष लवळे, संदीप शेळके पांढऱ्याचीवाडी ग्रामस्थ, पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठया संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!