16.2 C
New York
Friday, May 17, 2024

Buy now

बीड मधील रेशन दुकानात काळाबाजार:,केलं जातयं मापात पाप..!

बीड मधील रेशन दुकानात काळाबाजार:,केलं जातयं मापात पाप..!

निवासी संपादक-दिपक वाघमारे

बीड दि,३०- बीड शहरासह काही गावातील रेशन दुकानदार शासनाकडून गोरगरिबांना मिळणाऱ्या मोफत धान्याच्या मापात काळाबाजार करू लागले आहेत.

गोरगरिबांना शासनाच्या माध्यमातून मोफत धान्य दिले जाते परंतु काही दुकानदार हे लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मोफत धान्याच्या मापात काळाबाजार करून गोरगरिबांच्या तोंडातील घास हे दुकानदार हिरावून घेताना दिसत आहेत त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

जिल्हाधिकारी यांनी रेशन दुकानाची अचानक तपासणी करण्याचे आदेश देऊन संबंधित रेशन दुकानावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

शासनाने लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती तीन किलो तांदूळ व दोन किलो गहू पुढील एक वर्ष मोफत देण्याचे बंधनकारक केले आहे, मोफत रेशन देण्यासंबंधी तसे परिपत्रकही शासनाने काढले आहे परंतु काही दुकानदार लाभार्थ्यांना मिळणाऱ्या मोफत धान्याच्या मापात काळाबाजार करून लाभार्थ्यांकडून काही पैसेही घेताना दिसत आहेत असे लाभार्थ्यांकडून बोलले जात आहेत.

जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी स्वतः लक्ष घालून रेशन दुकानात असा काळाबाजार करणाऱ्या रेशन दुकानदारावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून तसेच लाभार्थ्यांकडून होत आहे.

रेशन दुकानदाराची तक्रार करा- तहसीलदार हजारे

रेशन दुकानदाराने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे धान्य वाटप करणे आवश्यक आहे परंतु काही दुकानदार लाभार्थ्यांना कमी धान्य देऊन फसवणूक करत असतील तर लाभार्थ्यांनी रेशन दुकानदाराची तक्रार माझ्याकडे करावी त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल.

 

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!