19.6 C
New York
Sunday, October 19, 2025

Buy now

spot_img
spot_img

महाराष्ट्राचा 56 वा वार्षिक निरंकारी संत समागम पैठण नगरीमध्ये संपन्न होणार.

महाराष्ट्राचा 56 वा वार्षिक निरंकारी संत समागम पैठण नगरीमध्ये संपन्न होणार, 

 

वडवणी तालुक्यातील हजारो भाविक भक्त जाणार.

वडवणी प्रतिनिधी – अंकुश गवळी 

सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन सानिध्यात महाराष्ट्राचा 56 वा प्रादेशिक निरंकारी संत समागम. 27.28.29. जानेवारीला बिडकीन तालुका पैठण येथे संपन्न होणार आहे, निरंकारी मिशन नेहमीच मानवतेच्या कार्यासाठी पुढे राहिलेले आहे, रक्तदान ,स्वच्छता ,अभियान, वृक्षारोपण आरोग्य शिबिर अशा अनेक सामाजिक व अध्यात्मिक कार्यामध्ये संत निरंकारी मिशनच विशेष योगदान आहे.

मानवता व विश्वबंधुत्व यांच संगम म्हणजे निरंकारी संत समागम. प्रेम ,नम्रता, सहनशीलता हे भक्तीचे मूलभूत पेलू असून हीच भक्तीची खरी ओळख आहे. संत निरंकारी मिशनचा तोच संदेश, एकाला जाणा, एकाला माना .आणि एक वाह असा आहे, जोपर्यंत मनुष्य एक ईश्वराला जाणत नाही, तोपर्यंत भक्तीचा खरा आनंद प्राप्त होत नाही, म्हणून संत निरंकारी समागम च्या माध्यमातून आव्हान करण्यात येत आहे, कि येत्या 27.28.व 29. जानेवारीला पैठण नगरी जवळ, बिडकीन येथे विशाल प्रांगण मध्ये भव्य दिव्य संत समागम संपन्न होत आहे, या समागम मध्ये वडवणी तालुक्यातील हजारो भाविक भक्त जाणार आहेत , बीड जिल्ह्यातून खूप मोठ्या प्रमाणात भावीक भक्त या समागम सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत, या समागम मध्ये राहण्याची खाण्याची सर्व सोय करण्यात येणार आहे, असे आव्हान देवगाव हरदेव नगर शाखेच्या वतीने करण्यात येत आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!