संगतीने माणसांचे जिवन घडते अनिल महाराज कासकर यांचे प्रतिपादन…
बीड प्रतिनिधी – प्रतिवर्षाप्राणे या ही वर्षी गुरुनाम गुरु बंकटस्वामी महाराज, सुदामदेव बाबा व शांतीब्रम्ह ह. भ. प रामहरी महाराज यांच्या आशीर्वादाने व ह. भ. प लक्ष्मण महाराज मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदवाडी येथे श्री हनुमान जयंती निमित्त चालु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची चौथ्या दिवसाची किर्तन सेवा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असे किर्तनकार ह. भ. प अनिल महाराज कासकर यांची संपन्न झाली. महाराजांनी उपस्थीत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
संगतीने माणसांचे जिवन घडते असे यावेळी महाराजांनी आपल्या अभंगातून भाविकांना संदेश दिला पुढे बोलत असताना महाराज म्हणाले चांगल्या माणसांची संगत केली तर माणसाच जिवन घडत व वाईट माणसाचं संगत केली तर माणसं जिवन अधोगती ला जाते . त्यासाठी माणसांनी चांगल्या व्यक्तीच्या संगतीला राहावे. यावेळी योगेश महाराज जोगदंड लक्ष्मीकांत महाराज कदम गणेश महाराज व गावकरी मंडळी आनंदवाडी उपस्थित होते.