9.8 C
New York
Friday, May 23, 2025

Buy now

spot_img
spot_img

समाजासाठी माघार घेतल्यानंतर डॉ. ज्योती मेटे पुन्हा अध्यात्मिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय.

समाजासाठी माघार घेतल्यानंतर डॉ. ज्योती मेटे पुन्हा अध्यात्मिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय…
डॉ.ज्योतीताई मेटे यांच्या हस्ते खडकीघाट येथील यशस्वी तरुणांचा सत्कार…
  बीड प्रतिनिधी – स्व . लोकनेते विनायकरावजी मेटे साहेब यांच्या विचारांचा वसा आणि वारसा यशस्वीपणे सांभाळणाऱ्या शिवसंग्रामच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. ज्योतीताई विनायकराव मेटे यांनी काही तासापूर्वीच समाजासाठी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर बीड तालुक्यातील अनेक अध्यात्मिक, पारिवारिक व सामाजिक कार्यक्रमास उपस्थित राहून सामाजिक संवेदनशीलतेचे  दर्शन घडवले आहे.यामध्ये मौजे सिरसमार्ग ता. गेवराई येथे श्रीक्षेत्र नारायण गडाचा नारळी अखंड हरिनाम सप्ताह व संगीत तुलसी रामकथा निमित्त आयोजित फुले टाकण्याचा कार्यक्रमास उपस्थित राहून भाविक भक्तांशी संवाद साधला तद नंतर खडकी घाट येथील अभिमान वाघ यांचे वृद्धपकाळाले दुःखद निधन झाले त्यांचा मुलगा अजित वाघ व परिवारास भेट देऊन सांत्वन केले.यादरम्यान शिवसंग्राम परिवारातील व हितचिंतकांच्या कौटुंबिक कार्यक्रम व लग्न सोहळ्यास उपस्थित राहून त्यांनी शुभेच्छा दिल्या.तसेच बीड तालुक्यातील खडकी घाट येथील ग्रामीण भागातील तरुणांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून स्वतःचे स्वप्न पूर्ण केले . या यशस्वी गुणवंत तरुणांचा सत्कार डॉ.ज्योतीताई मेटे यांच्या हस्ते काल करण्यात आला .
       खडकी घाट येथील  सुरज भोसले जिल्हा परिषद जालना येथे शिक्षक म्हणून निवड झाली . तसेच उमेश ढास यांची नगर ग्रामीण विभागांमध्ये विद्युत सहायक म्हणून निवड झाली. याच गावातील विठ्ठल माने यांची तलाठी म्हणून बीड येथे व शिक्षक म्हणून जिल्हा परिषद जालना येथे दोन्ही ठिकाणी निवड झाली. रघुवीर कुरे यांची आरोग्य निरीक्षक परंडा येथे निवड झाली तसेच रौळसगांव येथील ऋषिकेश जाधव यांची पुणे ग्रामीण पोलीस मध्ये निवड झाली. या सर्व गुणवंत युवकांचा सत्कार शिवसंग्रामच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. ज्योतीताई विनायकराव मेटे यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष नारायण दादा काशिद , श्री.नितीनजी लाटकर साहेब , तालुकाध्यक्ष नवनाथ प्रभाळे, रामदासजी नाईकवाडे , सचिन जाधव, गौतम जोगदंड , महिला जिल्हाध्यक्षा मनीषाताई कुपकर , शहर उपाध्यक्षा संगीताताई ठोसर, माजी सभापती मनीषाताई कोकाटे, शिवसंग्राम नेते ज्ञानेश्वर कोकाटे, गणेश साबळे , शैलेश सुरवसे, शिवराज उगले , सुहास मेटे मिडीया प्रमुख प्रा.पंडित शेंडगे व अन्य शिवसंग्राम पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!