9.8 C
New York
Friday, May 23, 2025

Buy now

spot_img
spot_img

भाच्याच्या लग्न कार्यासाठी निघालेल्या मामाचा अपघात..

भाच्याच्या लग्न कार्यासाठी निघालेल्या मामाचा अपघात..

बीड प्रतिनिधी – केजमध्ये भाच्याच्या लग्न कार्यासाठी निघालेल्या मामाचा दुचाकी – अॅपे रिक्षा अपघातात जागीच मृत्यू झाला. केज तालुक्यातील आनंदगाव (सा.) येथील येडेश्वरी साखर कारखान्याजवळ (दि.२१) दुपारी १२ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. केज तालुक्यातील विडा येथील सुंदर मंचिक पटाईत (वय ५१) यांच्या भाच्याचे युसुफवडगाव येथे आज लग्न होते. लग्न कार्यासाठी ते विड्याहून युसुफवडगावकडे दुचाकीवर निघाले होते. आनंदगाव (सा.) येथील येडेश्वरी साखर कारखान्याजवळ दुपारी १२ च्या सुमारास ते आले असता अॅपेरिक्षाची त्यांच्या दुचाकीला जोराची धडक बसली. या अपघातात पटाईत हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. केज ठाण्याचे पोलीस नाईक बाळासाहेब अहंकारे यांनी पंचनामा केल्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!