9.8 C
New York
Friday, May 23, 2025

Buy now

spot_img
spot_img

बीड तालुक्यातील मौजे अंधापुरी घाट येथे 71 वा ‘फिरता नारळी’सप्ताहास सुरवात.!

  • बीड तालुक्यातील मौजे अंधापुरी घाट येथे 71 वा ‘फिरता नारळी’सप्ताहास सुरवात.!
  • 🔲 उपसंपादक-दिपक वाघमारे 
  • बीड प्रतिनिधी:- बीड तालुक्यातील मौजे अंधापुरी घाट येथे गुरु बंकट स्वामी महाराज यांच्या कृपेने व वै ह.भ.प गिरी महाराज व ज्ञानेश्वर माऊली,सुदाम देव महाराज, गुरुवर्य शांती ब्रह्म रामहरी बाबा यांच्या कृपाशीर्वादाने व ह भ प लक्ष्मण महाराज मेंगडे व महादेव महाराज (तात्या) यांच्या मार्गदर्शनाखाली व समस्त गावकरी मंडळी अंधापुरी घाट यांच्यावतीने- गुरुनाम गुरु वै. प्रात स्मरणीय बंकट स्वामी महाराज यांचे शिष्य वै गुरुवर्य सुदाम देव महाराज यांनी सुरू केलेला 71 वा फिरता नारळी सप्ताह व श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळ्यास वार गुरुवार दिनांक 18 /4/ 2024 रोजी बीड तालुक्यातील मौजे अंधापुरी घाट येथे या महान सोहळ्यास सुरवात झाली आहे.
  • सात दिवस चालणाऱ्या या सप्ताह निमित्त गावामध्ये रोज नामांकित कीर्तनकारांचे अमृततुल्य असे किर्तन सेवा होणार आहेत तसेच प्रसिद्ध भागवत कथाकारांचे प्रसिद्ध राष्ट्रीय प्रवक्ते संतोषानंद महाराज शास्त्री यांचे भागवत कथेचे कार्यक्रम होणार आहेत तसेच गाथा भजन,हरिपाठ, काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण,संगीत भजन असे विविध कार्यक्रम होणार आहेत.
  • फिरता नारळी सप्ताह निमित्त गावामध्ये रोज गावकऱ्यांच्या वतीने व समस्त गावकरी मंडळी अंधापुरी घाट यांच्यावतीने सप्ताह निमित्त महापंगतीचे आयोजन करण्यात आले असून रोज सकाळ व संध्याकाळी महापंगती होणार आहेत. तरी परिसरातील तसेच बालाघाटावरील भावीक भक्तांनी, नागरिकांनी, माता-भगिनींनी व गावकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने याचा लाभ घ्यावा असे आवाहन अंधापुरी घाट येथील गावकऱ्यांच्या वतीने व समस्त गावकरी मंडळी अंधापुरी घाट यांच्या वतीने करण्यात आले आहे.
  • नारळी सप्ताहाची सांगता गुरुवार दिनांक 25/ 4/ 2024 रोजी होणार असून यानिमित्त श्री गुरुवर्य ह भ प लक्ष्मण महाराज मेंगडे ( मठाधिपती बंकट स्वामी संस्थान निनगुर,आळंदी,पंढरपूर यांचे सकाळी 11ते 1 या वेळेत अमृततुल्य असे काल्याचे किर्तन होणार असून नंतर लगेचच महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे तरी तालुक्यातील तसेच परिसरातील जास्तीत जास्त भाविक भक्तांनी व नागरिकांनी, माता भगिनींनी व गावकऱ्यांनी काल्याच्या कीर्तनाचा व पवित्र अशा महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे गावकऱ्यांच्या वतीने व समस्त गावकरी मंडळी अंधापुरी घाट यांच्यावतीने सांगण्यात आले आहे.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!