8.8 C
New York
Friday, May 23, 2025

Buy now

spot_img
spot_img

बीड मधून ज्योतीताई मेटे यांची उमेदवारी फायनल ?

  • बीड मधून ज्योतीताई मेटे यांची उमेदवारी फायनल ?
  • ज्योतीताई मेटे आज पुन्हा शरद पवार यांची भेट घेणार..
  • बीड प्रतिनिधी –  भाजप नेत्या पंकजा मुंडे या पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. देशभरात भाजपचे वारे आहे. राज्यात भाजपसोबत शिवसेना आणि राष्ट्रवादीची ताकद मदतीला आहे. पण खरेच पंकजा यांच्यासाठी ही सहज आणि सोपी निवडणूक आहे? याचा शोध यानिमित्ताने घेऊ. महाविकास आघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे आला आहे. शरद पवारांकडे ज्योती मेटे आणि बजरंग सोनवणे असे दोन पर्याय आहेत. त्यातील मेटे यांनी आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शऱद पवार यांनी अद्याप आपला निर्णय दिलेला नाही. बीडमधील सामाजिक समीकरणे लक्षात घेतली. तसेच आज डॉक्टर ज्योतीताई मेटे या शरद पवार यांची भेट घेणार आहेत या भेटी दरम्यान नेमकी कोणती चर्चा होती याकडे सर्व राज्याचे लक्ष लागलेले आहे यामुळे महाविकास आघाडीचा बीडचा उमेदवार नक्कीच आज ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे आणि यातूनच आज डॉक्टर ज्योतीताई मेटे यांना बीड लोकसभेचे उमेदवारी मिळते की काय यावर सुद्धा अजून सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. परंतु आज ज्योती मेटे या शरद पवारांची भेट घेणार आहेत. महायुती चा उमेदवार जाहीर होऊ नाही अद्याप पर्यंत महाविकास आघाडीचा कोणताही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही परंतु बजरंग सोनवणे यांनी भेटीगाठी दौरा सुरू केला आहे तसेच आज ज्योती मेटे शरद पवारांची भेट घेणार ज्योती मेटे यांना बीड लोकसभेचे उमेदवारी मिळणार आहे असे चर्चेला उधाण आले आहे. राष्ट्रवादीकडून ज्योती मेटे या रिंगणात उतरविणे याचा अर्थ या मतदारसंघात वंजारी आणि मराठा असे मतांचे ध्रुवीकरण होण्याची ती खेळी असू शकते. याच ध्रुवीकरणावर पुढील समीकरणे फिरू शकतात. शिवसंग्राम या मराठा संघटनेचे अध्यक्ष असलेल्या विनायक मेटे यांच्या ज्योती या पत्नी. विनायक मेटे यांचे अकाली अपघाती निधन झाल्याने या संघटनेची सूत्रे ज्योती मेटे यांच्याकडे आहेत. विनायक मेटे यांनी आपली सारी राजकीय कारकिर्द कधी मुंडे तर कधी पवार यांच्या मदतीने जिवंत ठेवली. मुंडे यांच्या निधनानंतर मेटे हे फडणवीस यांच्याशी सलगी ठेवून होते. आपल्या राजकीय संपर्काच्या बळावर आणि आमदारकीच्या साह्याने मेटेंनी आपले निष्ठावान कार्यकर्ते बीडमध्ये उभे केले. या कार्यकर्त्यांचे नेटवर्क ज्योती मेटे यांना उपयोगी पडू शकते. मेटे यांच्या निधनानंतरची सहानभूती मिळविण्यासाठीह ज्योती मेटे यांची उमेदवारी उपयोगात येऊ शकते विनायक मेटे हे मराठा नेते म्हणूनच परिचित होते. त्यामुळे तेथील मराठा मतांच्या ध्रुवीकरणाचे गणितही साधले जाते.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!