24.2 C
New York
Friday, July 18, 2025

Buy now

spot_img
spot_img

पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश..

  • पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश..
  • बीड प्रतिनिधी- बिंदुसरा, कर्झनी,शिवणी, लिंबारुई तलावांची आणि पिंपळनेर पाण्याची टाकीमधील पाणीसाठा पाहणी करताना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे, निर्देश जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी शनिवारी दिले.
  • शनिवारी जिल्हाधिकारी यांनी बिंदुसरा, कर्झनी,शिवणी, लिंबारुई, पाली, पिंपळनेर पाण्याची टाकी येथील तलावांची तसेच पाण्याची टाकीच्या पाणीसाठयाची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांशी आणि ग्रामस्थांशी पाणी बचतीविषयी चर्चा ही केली.
  • सध्या जिल्ह्यात पाणी टंचाई असून उपलब्ध पाणीसाठा नळाद्वारे अथवा टँकरद्वारे पिण्यासाठी, दररोजच्या वापरासाठी, शेती, फळबागांसाठी उपयोगी पडणार असून हे पाणी पावसाचे पाणी येईपर्यंत पुरविणे आहे. पाणीसाठ्याचा अवैध उपसा होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सक्त सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी केल्या. यासह अधिक काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.
  • या दौऱ्याच्या वेळी तहसिलदार बीड नरेंद्र कुलकर्णी,नायब तहसीलदार सुहास हजारे, गट विकास अधिकारी अनिरुद्ध सानप, श्री. नागरगोजे, श्री चांदणे, मंडळ अधिकारी शीतल चाटे, श्री शेळके, तलाठी श्री. गायकवाड, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!