उदय सामंत, अर्जुन खोतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार शिवसेनेची महत्वपूर्ण बैठक.!
- उदय सामंत, अर्जुन खोतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार शिवसेनेची महत्वपूर्ण बैठक.!
- सर्व पदाधिकाऱ्यांनी आवर्जून उपस्थित राहावे- जगताप, मुळूक, खांडे
- ====================
- बीड, प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते मा.ना. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा शिवसेना उपनेते ना. उदयजी सामंत साहेब व उपनेते , विभागीय संपर्कप्रमुख अर्जुन भाऊ खोतकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दिनांक-०२/०२/२०२४ रोजी दुपारी ३.०० वाजता. बीड शहरातील हॅाटेल ग्रॅंड यशोदा, बार्शी रोड येथे बीड जिल्हा शिवसेना, युवासेना, महिला आघाडी तसेच अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी यांची महत्त्वाची बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी लोकसभा संपर्कप्रमुख विजय पाटील संपर्कप्रमुख भाऊसाहेब मोरे यांचीही उपस्थिती राहणार आहे.

- उदयजी सामंत, अर्जुन भाऊ खोतकर, विजय पाटील, भाऊसाहेब मोरे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत असलेल्या बैठकीत महत्वपूर्ण मुद्यांवर चर्चासत्र तथा मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या महत्वपूर्ण बैठकीसाठी बीड जिल्हा शिवसेना, युवासेना, महिला आघाडी तसेच अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन बीड शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप, सचिन मुळुक आणि कुंडलिक खांडे यांनी केले आहे.
- •••••
error: Content is protected !!