शिर्डी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचा शुभारंभ..
- शिर्डी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचा शुभारंभ..
- ♦️निवासी संपादक-दिपक वाघमारे
- शिर्डी, दि.२६- केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेंतर्गत शेतकऱ्यांना केंद्राच्या योजनेव्यतिरिक्त ६ हजार रुपये दरवर्षी देण्यात येणार आहेत. या योजनेमुळे केंद्र आणि राज्याचे मिळून १२ हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत. या योजनेसाठी या वर्षी ६ हजार ९०० कोटी रुपयांची तरतूद केली असून आज सुमारे ८६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर १७१२ कोटी रुपयांच्या पहिल्या हप्त्याचे वितरण करुन ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचा शुभारंभ झाला.
error: Content is protected !!