17.4 C
New York
Thursday, May 16, 2024

Buy now

प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास योजनेचे उद्घाटन संपन्न

प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास योजनेचे उद्घाटन संपन्न

नेकनूर – प्रतिनिधी- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विश्वकर्मा कौशल्य विकास योजनेचे उद्घाटन पूर्ण भारतभर करण्यात आले आहे त्याच अनुषंगाने आज महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना स्फूर्ती देणारे प्रमोद महाजन ग्रामीण विकास योजनेचे उद्घाटन संपन्न झाले. ऑनलाईन पंतप्रधान मोदी साहेब यांचे हस्ते या योजनेचे उद्घाटन करण्यात आले.

बीड तालुक्यातील नेकनूर या ठिकाणी श्री सानप अनिरूध बी डी ओ यांच्या हस्ते करण्यात आले ऐमी इंडिया मायक्रोसफ्टचे प्रायव्हेट लिमिटेड संचालित माऊली कॉम्पुटर नेकनूर यांना या योजनेचे अंमलबजावीसाठी नियुक्त करण्यात आले. यावेळी उपस्थिती श्री नागरे साहेब ग्रामविकास अधिकारी नेकनूर तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व शासकीय कर्मचारी ITI बीड उपस्थित होते तशेच माऊली कॉम्प्युटर्स चे संचालक महारुद्र वाणी व पञकार तुळशीराम शिंदे, पञकार अशोक शिंदे, माऊली न्यूज चे संपादक अभिजीत पवार, नेकनूर येथील विद्यार्थी व ग्रामस्थ.मोठया संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!