26.6 C
New York
Sunday, July 20, 2025

Buy now

spot_img
spot_img

संगम जळगाव येथील मराठा बांधवांचा ग्रामपंचायत निवडणूकीवर बहिष्कार

  • संगम जळगाव येथील मराठा बांधवांचा ग्रामपंचायत निवडणूकीवर बहिष्कार
    —————
    गेवराई तहसिलदारांसह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; आधी मराठा आरक्षण नंतर निवडणूक
    —————
  • गेवराई : सोमनाथ मोटे सह शाम जाधव
  • मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत निवडणूक नाही,अशी भूमिका घेत संगम जळगाव येथील मराठा बांधवानी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याचे जाहीर केले आहे. निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करणार नाहीत,असे लेखी निवेदन बीड जिल्हाधिकारी तसेच गेवराई तहसीलदार यांना दिले आहे.
  • गेवराई तालुक्यातील संगम जळगाव येथे मराठा बांधवांची बैठक संपन्न झाली.यात एकमुखी निर्णय घेण्यात आला,की जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुकीवर मराठा बांधवांचा बहिष्कार असेल.अशा प्रकारे एकमुखी निर्णय घेऊन निवडणुकीवर बहिष्कार टाकणारे संगम जळगाव हे तालुक्यातील एकमेव गाव ठरले आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका स्थगित करा, जर निवडणुका घेतल्या तर संगम जळगाव येथील मराठा उमेदवार निवडणूकीत उमेदवारी दाखल करणार नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. दिलेल्या निवेदनात त्यांनी पुढे म्हटले की, सध्या मराठा आरक्षण आंदोलन पेटलेले असताना ग्रामपंचायत निवडणूका जाहीर झाल्याचे समजत आहे. मराठा आरक्षणावरुन लक्ष विचलित करण्यासाठी कुठील डाव टाकल्याचे आम्हा संगम जळगाव मराठा समाजाचे मत आहे. त्यामुळे जो पर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली लागत नाही किंवा मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तो पर्यंत सकल मराठा समाजाचा एकमताने निवडणुकीवर बहिष्कार राहील असे संगम जळगाव येथील मराठा बांधवांनी गेवराई तहसीलदार, तसेच जिल्हाधिकारी बीड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. दिलेल्या निवेदनावर शेकडो मराठा बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!