12.8 C
New York
Monday, May 20, 2024

Buy now

रुग्णाचा नातेवाईकानो कधीतरी डाॅक्टरांनाही समजुन घ्या….!

  • रुग्णाचा नातेवाईकानो कधीतरी डाॅक्टरांनाही समजुन घ्या….!
    ————————–
    कौतुकास्पद.. गेवराई उपजिल्हा रुग्णालयात खडतर बाळंतपण यशस्वी ..
  • दि,19.गेवराई सोमनाथ मोटे सह शाम जाधव
    ============================
    अनेक आजार किंवा तब्येत बिघडल्यावर प्रत्ये क जण रुग्णालयात दाखल होत असतो. रुग्णा लयातील डाॅक्टर रुग्णाला बरे करण्यासाठीशर्थी चे प्रयत्न करत असतात अपवाद वगळता सर्वच जण डाॅक्टरांना देवमानतात आणि ते मानावे पण कारण डाॅक्टर रुग्णांची जी सेवा करतात ती खरोखरच तळमळीने करत असतात.
    अशीच काहीशी चांगली कामगिरी गेवराई उपजिल्हा रुग्णालय टीमने केलीये गेवराई उपजिल्हा रुग्णालयात एक महिला बाळंतपणासाठी दाखल झाली होती मात्र बाळंतपणा वेळी त्या महिलेला थायरॉईड चा त्रास होता आणि सिझर करावे लागत होते तेथील परिस्थिती वरुन वाटत होते की रुग्णाला गेवराई येथुन बीडला रेफर केले जाईल मात्र गेवराई उपजिल्हा रुग्णालय टीमने शर्थीचे प्रयत्न करत गेवराई उपजिल्हा रुग्णालयातच ही यशस्वी बाळंतपण केले.सिजर शस्त्रक्रिया करताना डाॅक्टरांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागले म्हणजेच शस्त्रक्रिया करण्यासाठी भुल दिलेली असताना अचानक शहरातील व रुग्णालयातील लाइट गेली मात्र उपजिल्हा रुग्णालय टीमने यशस्वी सिझर शस्त्रक्रिया करत आई व गोंडस बाळाला जिवनदान दिले.त्यामुळे रुग्णालयाला व डाॅक्टरांना कधीतरी समजावून घेणे गरजेचे आहे. आणी सरकार दरबारी तक्रारी करण्याप्रमाणे चांगल्या कामाचे कौतुक देखील करणे गरजेचे आहे.सदरच्या शस्त्रक्रियेसाठी डॉ शिवणीकर, महिला रोगतज्ञ,डॉ पंडित, भुलरोगतज्ञ, तसेच गेवराईचा परिचारिका बारगजे,सुकडे,शेरेकर, यांच्या सह आदी टीमने अथक परिश्रम घेतले.
    पालकांनी डॉ शिवणीकर व टिमला धन्यवाद मानले..

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!