14.3 C
New York
Monday, May 20, 2024

Buy now

शिवसंग्राम भवन येथे प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या गणरायाची बैलगाडीतून विसर्जन मिरवणूक..

  • शिवसंग्राम भवन येथे प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या गणरायाची बैलगाडीतून विसर्जन मिरवणूक..
  • डॉ. ज्योती मेटे यांच्या संकल्पनेतून आणि पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पर्यावरण पूरक मिरवणूक..
  • फुलांची उधळण; लेझीमचा ताल अन् बैलगाडी ठरली आकर्षण..
  • ♦️निवासी संपादक-दिपक वाघमारे 
  •  बीड दि 30:– शिवसंग्राम भवन येथे प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या गणरायाची मागील दहा दिवसापासून मनोभावे सेवा शिवसंग्रामच्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी केली. यात प्रशासकीय अधिकारी,वकील, डॉक्टर, पत्रकार आणि राजकीय, सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या हस्ते श्रीची आरती करण्यात आली.
  • गणरायांच्या आगमनापासून दहा दिवस शिवसंग्राम भवन येथील वातावरण भक्तीमय झाले होते. यात सर्व कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. मागील वर्षभरापासून दुःखात असलेले कार्यकर्ते साक्षात “विनायक” आगमनाने आनंदी होते. या प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या गणरायाची विसर्जन मिरवणूक देखील थाटामाटा काढण्यात आली मिरवणुकीपूर्वी स्व. विनायकराव मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र नारायणगडाचे मठाधिपती ह.भ.प. शिवाजी महाराज, माजी आ. राजेंद्र जगताप, अशोक हिंगे, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक ऑड. मंगेश पोकळे, विनोद इंगोले, कुंदाताई काळे, गौतम खटोड यांच्या हस्ते श्री ची आरती करण्यात आली त्यानंतर विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली.
  • डॉ. ज्योती मेटे यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत डीजे, गुलाल आणि प्रदूषण टाळत पर्यावरण पूरक विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचे आकर्षण म्हणजे पारंपारिक पद्धतीने बैलगाडी मधून ही मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पोलीस कॉलनी शाळेतील विद्यार्थी आणि शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी लेझीमवर ठेका धरला आणि गणरायावर फुलांची उधळण करत निरोप दिला. यावेळी चांगला पाऊस पडून बीड जिल्ह्यातील बळीराजा सुखावू दे असे साकडे गणरायाकडे डॉक्टर ज्योती मेटे यांनी घातले.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!