अनिलदादा जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जांब येथील असंख्य युवकांचा शिवसेनेत प्रवेश
- अनिलदादा जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जांब येथील असंख्य युवकांचा शिवसेनेत प्रवेश
- ♦️निवासी संपादक -दिपक वाघमारे
- ===================
- बीड, दि 30 :- शिवसेना उबाठा गटाला जिल्ह्यात नवी उभारी देण्यासाठी बीड शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप ताकदीनीशी कामाला लागले आहेत. आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून शिवसेनेची ताकद वाढवून जिल्ह्याभरात पक्षाला बळकटी देण्यासाठी अनिलदादा जगताप यांनी जिल्हाभरात कार्यकर्त्यांची मोट बांधायला सुरु केले आहे. अनिलदादांची शिवसेनेवर 37 वर्षांपासून असलेली निष्ठा आणि कार्यपद्धती पाहून तरुणाई मोठ्या प्रमाणात प्रभावित होत असल्याचे दिसून येत आहे.
- दि. 30 सप्टेंबर रोजी बीड शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे बीड विधानसभा मतदार संघातील जांब ता. शिरूर येथील युवकाने शिवसेना मध्यवर्ती कार्यालय बीड येथे येऊन शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. सखाराम गणपत सातपुते, देविदास वाघमारे, सोसायटी सदस्य नितेश रसाळ, अशोक तांबारे, शेख कलीम शेख, गानिभाई, राहुल वाघमारे, पोपट सानप, योगेश केदार या युवकांचा अनिलदादा जगताप यांनी बीड शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये पुष्पगुछ देऊन स्वागत सत्कार केला. याप्रसंगी तालुका प्रमुख किरण चव्हाण, राज तांबारे, नवनाथ सोनसाळे शिवसेना शिवदूत, कुश भैया पोकळे, महेश जोगदंड उपस्थित होते.
- जिल्ह्याभरातून विविध तालुक्यातून तरुण कार्यकर्ते अनिलदादांच्या पाठीशी उभारत असून जिल्ह्याभरात पुन्हा एकदा नव्याने शिवसेना उबाठा बळकट सशक्त होताना दिसून येत आहे. शिवसेनेबरोबर जुळूत असलेली तरुणाई उद्याच्या विजयाची पायाभरणी ठरणार असल्याचे मत याप्रसंगी अनिलदादा जगताप यांनी व्यक्त केले. दरम्यान शिवसेनेत प्रवेश केलेल्या असंख्य युवकांनी अनिलदादा यांचे आभार मानले. याप्रसंगी अनिलदादा जगताप यांच्याबरोबर बीड शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.
- ——————–
error: Content is protected !!