12.8 C
New York
Monday, May 20, 2024

Buy now

स्वामी विवेकानंद अभ्यासिकेचा चौथा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात पार पडला.

स्वामी विवेकानंद अभ्यासिकेचा चौथा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात पार पडला.

बीड प्रतिनिधी – बीड जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ असलेली नेकनूर शहरातील स्वामी विवेकानंद अभ्यासिकेचा शुक्रवारी चौथा वर्धापन दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त वेगवेगळ्या पदावर गेलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. अभ्यासिकेचे संचालक अनिल कासकर यांनी विद्यार्थ्यांसाठी रात्रंदिवस कष्ट करून अभ्यासिका उभारली. कार्यक्रमांमध्ये बोलताना अनिल कासकर यांनी विद्यार्थ्यांना प्रबोधन पर भाषण केले. संचालकाचे शब्द ऐकून विद्यार्थी भारावून गेले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये खूप आनंद यावेळी दिसला. स्वामी विवेकानंद अभ्यासिकेचे संचालक अनिल कासकर सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असतात. गोरगरीब विद्यार्थ्यांना सतत मदत करत असतात. यावेळी उपस्थित मुजावर सर, रोकडे सर, कदम सर, चव्हाण सर व आजी माजी विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!